ETV Bharat / state

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी लाच घेणारा उपकोषागार अधिकारी रंगेहात पकडला - पोलीस उपअधीक्षक श्रीकांत निचळ

प्राप्त तक्रारीची लाच लुचपत प्रतिबंध विभागाने पडताळणी केली. त्यानंतर काल मंगळवारी 8 डिसेंबर रोजी मोताळा उपकोषागार कार्यालयात सापळा रचण्यात आला होता.

उपकोषागार अधीकाऱ्याला अटक
उपकोषागार अधीकाऱ्याला अटक
author img

By

Published : Dec 9, 2020, 4:32 AM IST

Updated : Dec 9, 2020, 7:12 AM IST

बुलडाणा - मानधनाचे दोन महिन्याचे बिल काढण्यासाठी उपकोषगार अधिकाऱ्याला कंत्राटी कर्मचाऱ्याकडून ३ हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात अटक करण्यात आले. प्रमोद आनंदराव मोहोड असे त्या लाचखोर उपकोषागार अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंध विभागाने मंगळवारी दुपारी केली.

दोन महिन्याचे मानधन काढण्यासाठी मागितले होते 6 हजार

कंत्राटी कर्मचाऱ्याच्या दोन महिन्याचे मानधन काढण्यासाठी मोताळा येथील उपकोषागार अधिकारी प्रमोद आनंदराव मोहोड (वय 47) यांनी तक्रारदार कंत्राटी कर्मचाऱ्यास 6 हजार रुपयाची मागणी केली होती. तडजोडीअंती दोन टप्यामध्ये पैसे देण्याचे निश्चीत झाले. यातील पहिला
टप्पा 3 हजार रुपये देण्यापुर्वी कंत्राटी कर्मचाऱ्याने लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या कार्यालयात रितसर तक्रार नोंदवली.

मोहोड यांना पडकले रंगेहात

प्राप्त तक्रारीची लाच लुचपत प्रतिबंध विभागाने पडताळणी केली. त्यानंतर मंगळवारी 8 डिसेंबरला मोताळा उपकोषागार कार्यालयात सापळा रचण्यात आला. पंचासमक्ष ठरल्याप्रमाणे पहिला टप्पा म्हणून 3 हजार रुपये उपकोषागार अधिकारी प्रमोद मोहोड यांना देण्यात आला. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोहोड यांना रंगेहात पडकले.

या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत मोहोड यांच्या विरोधात बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे प्रभारी पोलीस उपाधिक्षक श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात नाईक विलास साखरे, विनोद लोखंडे, जगदीश पवार, अर्शद यांनी केली.

हेही वाचा- दिनविशेष : आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस; विकासाच्या मार्गातील अडथळा कधी संपणार?

Last Updated : Dec 9, 2020, 7:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.