ETV Bharat / state

बुलडाणा : रस्त्यात भरदिवसा तरुणीवर धारदार शस्त्राने वार करून हत्या - case

अश्विनी सुधीर निंबोकार (२७) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. तिच्या चेहऱ्यावर आणि पोटावर धारधार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. पोलीस आरोपींचा  कसून शोध घेत आहेत.

घटनास्थळी पंचनामा करताना पोलीस
author img

By

Published : May 17, 2019, 5:09 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील खामगावातील संजीवनी कॉलनीत २७ वर्षीय युवतीचा खून झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. भरदिवसा उघडकीस आलेल्या या घटनेमुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे. अश्विनी सुधीर निंबोकार (२७) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे.

घटनास्थळी पंचनामा करताना पोलीस

संजीवनी कॉलनीत एका मुलीचा मृतदेह पडला असल्याची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. युवतीच्या चेहऱ्यावर आणि पोटावर धारधार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. हल्ल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले असून, पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. मृत युवती स्थानिक सनी पॅलेस भागात राहणारी असल्याचे समजते.

Intro:Body:बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील खांमगावातील संजिवनी कॉलनीत २७ वर्षीय युवतीचा खून झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी ३ वाजता दरम्यान उघडकीस आली. भरदिवसा उघडकीस आलेल्या या घटनेमुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे.कु. अश्विनी सुधीर निंबोकार(२७) असे खून झालेल्या युवतीचे नाव असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

संजिवनी कॉलनीत एका मुलीचे प्रेत पडलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळताच खांमगाव शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.युवतीच्या चेहऱ्यावर धारधार शस्त्राने आणि पोटावर सपासप वार केल्यानंतर हल्ला करण्यात आल्याचा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.हल्ल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले असून, पोलिस याप्रकरणी कसून शोध घेताहेत. मृतक युवती स्थानिक सनी पॅलेस भागात राहणारी असल्याचे समजते.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.