बुलडाणा - पावसाळा असला की साप बाहेर पडायला लागतात. यामुळे सध्या अनेक ठिकाणी साप बाहेर पडायला लागले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरा लागत असलेल्या सुटाळा खुर्द येथील एका घरात कोब्रा या विषारी जातीचा साप आढळला. स्थानिकांनी त्वरीत सर्पमित्र गणेश राजपूत आणि सचिन ठाकरे यांना बोलावले या सर्पमित्रानी सापाला पकडून सापाला जीवनदान दिले.
साप दिसताच क्षणी घाबरवणारा प्राणी, सळो कि पळो करुन टाकणारा प्राणी म्हणजे साप. यामुळे अश्या सापांना मारून टाकण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र, मंगळवारी सायंकाळी खामगाव तालुक्यातील सुटाळा खुर्द येथील अनिकट रोड परिसरात राहणाऱ्या खरात यांच्या घरामध्ये दसऱ्या निमित्त संपूर्ण नातेवाईक जमले होते. त्यावेळेस त्यांच्या पाठीमागे जागेत अत्यंत विषारी कोब्रा जातीचा साप दिसून आला. साप दिसताच सर्वत्र धावपळ सुरु असतानां खरात कुटुंबीयांनी याची माहिती जवळच्या गणेश राजपूत या सर्पमित्राला दिली. सर्पमित्राने तात्काळ खरात यांच्या त्यांच्या घरीपोहचून अत्यंत विषारी सापाला पकडून जीवनदान दिले. दसरा हा सण संपूर्ण भारत देशांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यावेळी सर्पमित्राने अत्यंत हुशार असलेल्या कोब्रा सापाला जीवन दान दिल्यामुळे संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. सदर सापाला जंगलात सोडून देण्यात आले.