ETV Bharat / state

HSC Maths Paper Leak : बारावी गणिताचा पेपर फूटप्रकरणी आता एसआयटीमार्फत तपास होणार - 12th Maths paper content breaking Case

संपूर्ण राज्याचे आणि ज्या बारावी गणिताच्या विषयाच्या पेपराचे पडसाद विधानसभेमध्ये उमटले होते. आता त्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास SIT मार्फत तपास करण्यात येणार आहे. आतापर्यंत या प्रकरणांमध्ये सात आरोपींना ताब्यात घेतले असून काल पकडलेल्या दोन्ही आरोपी शिक्षकांना 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यापूर्वी हा बारावीचा पेपर पुन्हा होणार नाही असे बोर्डामार्फत सांगण्यात आले असले. तरी आता एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याने येणाऱ्या काही दिवसात पुन्हा काही बोर्डामार्फत फेर परीक्षेचा निर्णय घेतला जातो का? याकडे मुख्यत:ह विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

HSC Maths Paper Leak
परीक्षा
author img

By

Published : Mar 6, 2023, 10:38 PM IST

Updated : Mar 6, 2023, 10:58 PM IST

बुलडाणा: या आधीच इंग्रजी विषयांमध्ये प्रश्न आयोजित उत्तर छापून दिल्याने शिक्षण विभागाला सहा गुण विद्यार्थ्यांना द्यावे लागत असताना. त्या पाठोपाठ आता बारावी च्या गणित सारख्या महत्त्वाच्या विषयाची फेर परीक्षा घेण्या करता शिक्षण मंडळाला विचार करावा लागतो का याकडे सर्व लक्ष लागले आहे. एकंदरी आता हा तपास एसआयटी मार्फत होणार असल्याने या पेपर फुट प्रकरणाचे मुख्य सूत्रधार पर्यंत कशा पद्धतीने आणि तेही कमी वेळामध्ये पोहोचल्या जाते हा सुद्धा एक त्यांच्यासमोरचा मोठा प्रश्न असेल. जे आरोपी आतापर्यंत ताब्यात घेतले आहे त्यामध्ये काही खाजगी शिक्षण संस्थातील शिक्षक देखील आहे. त्याच परिसरातील काही इसम कार्यरत आहेत. नेमका कसा हा व्हाट्सअप ग्रुप तयार झाला आणि त्याचे कनेक्शन मुंबई पर्यंत देखील सापडल्याचे पोलीस सूत्रांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे..

मोठे रॅकेट सक्रिय? अतिशय गोपनीय पद्धतीने हा सर्व पेपर फुटी प्रकार गृह विभागाकडून हाताळला जात असून संपूर्ण राज्य सरकारची शिक्षण विभाग खळबडून जागे झाले आहे. सुरुवातीला अतिशय हलक्यात घेणाऱ्या या पेपर फुटीला आता एसआयटीकडे वर्ग करण्यात येत असल्याने याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे .निश्चित यामध्ये काहीतरी मोठे रॅकेट सक्रिय असू शकते का? हा शोध घेतला जाईल.

अमरावती बोर्डचे सचिव यांनी काढले पत्रक: सिंदखेड राजा तालुक्यातील केंद्र क्रमांक 601 602 606 609 या परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालक वर्णन तात्काळ बदल करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. तसेच तालुक्यातील बारावीच्या केंद्र संचालक यांनी तीन मार्च रोजी सायंकाळी तात्काळ बैठक घेऊन तेजराव काळे सहसचिव विभागीय परीक्षा मंडळ अमरावती यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी केंद्र अध्यक्ष व रनर यांना सुद्धा सूचना दिल्या आहेत. केंद्र अध्यक्ष तसेच रनर यांची काळजी घेऊन परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पाडण्यासाठी योग्य ती खबरदारी. तसेच परीक्षा केंद्राच्या आवारा मध्ये बाहेरील व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांना भयमुक्त कॉपी मुक्त परीक्षा सुरळीत पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत .यावेळी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद शिक्षण उपनिरीक्षक जगन मुंडे तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड सिंदखेड राजा चे गटशिक्षण अधिकारी रंगनाथ गावडे देऊळगाव राजा गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले तालुक्यातील केंद्र संचालक व रनर उपस्थित होते तर एकंदरीत गृह विभागापाटोपाठ आता शिक्षण विभागादेखील खडबडून जागे होऊन अत्यंत कठोर पावलं उचलत. सर्व त्या उपाययोजना करत कॉपीमुक्त सरकारच्या अभियानाला यापुढे कुठे सुरंग लागू नये. याची काळजी घेत आहे.

हेही वाचा: ED Raid : मुंबईसह नागपुरात ईडीची मोठी कारवाई; 15 ठिकाणी छापे टाकत केले करोडोंचे दागिने आणि रोकड जप्त

Last Updated : Mar 6, 2023, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.