ETV Bharat / state

'सांगाना उद्धव साहेब, खामगाव-जालना रेल्वे मार्गात कोण आडवे आले?'

उद्या खामगाव येथेच प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. मात्र त्यांनी ५ वर्षापूर्वी दिलेलं आश्वासनच अजून पूर्ण झाले नाही.

author img

By

Published : Apr 12, 2019, 12:14 AM IST

उद्धव ठाकरे आणि लोकआंदोलन समिती अध्यक्ष

बुलडाणा - उद्धव ठाकरे यांनी पाच वर्षांपूर्वी खामगावच्या सभेत " तुम्ही प्रतापराव जाधवांना खासदार म्हणून निवडून द्या, खामगाव-जालना रेल्वेमार्गामध्ये कोण आडवे येते ते मी बघतोच " असे आश्वासन दिले होते. पाच वर्षे उलटली तरी या रेल्वेमार्गाचे काम सुरू झाले नाही. उद्या खामगाव येथेच प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. त्यामुळे 'सांगा ना उद्धव साहेब खामगाव-जालना रेल्वेमार्गात कोण आडवे आले ते ? असा सवाल रेल्वे लोकआंदोलन समितीने ठाकरे यांना विचारला आहे.

उद्धव ठाकरे आणि लोकआंदोलन समिती अध्यक्ष

पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीची प्रचार सभा खामगाव येथे 4 एप्रिल 2014 ला आयोजित केली होती. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतापराव जाधव यांना खासदार म्हणून पुन्हा निवडून दिल्यास खामगाव-जालना रेल्वेमार्गाची जबाबदारी आपण स्वीकारणार, असे जाहीर केले होते. " हा रेल्वेमार्ग सुरू होण्यात कोण आडवे येते ते मी बघतोच " अशा आवेशात त्यांनी या रेल्वेमार्गाबद्दल आपण फार संवेदनशील असल्याचे भासवले होते. परंतु खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर ना प्रतापराव जाधवांनी आपले कर्तव्य पार पाडले, ना उद्धव ठाकरे आपल्या शब्दाला जागले. पुन्हा पाच वर्षांनी तेच जुने आश्वासन देऊन उद्धव ठाकरे यांनी मतदारांना मुर्ख बनवू नये, अशी अपेक्षा रेल्वे लोकआंदोलन समितीने व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनाला चार वर्षे पूर्ण झाल्याने रेल्वे लोकआंदोलन समितीने गेल्या वर्षी ४ एप्रिल 2018 पासून चिखली तहसील कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह सुरू केला होता. या आंदोलनाला उत्स्फूर्त जनसमर्थन मिळाले होते. खासदार जाधव यांनी या आंदोलनाला भेट दिली, मात्र काहीच ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे जनतेमध्ये नाराजी निर्माण झाली. तत्कालीन कृषी मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांनी दीड महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने समितीने हे आंदोलन स्थगित केले. परंतु दुर्दैवाने 45 दिवसांची मुदत होण्यापूर्वीच भाऊसाहेब फुंडकर यांचे दुर्दैवी निधन झाल्याने हा विषय पुन्हा रेंगाळत पडला.
बुलडाणा जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी केवळ पोकळ आश्वासने देऊन काम चालणार नाही. तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल, याची जाणीव उद्धव ठाकरे यांना असेल, अशी अपेक्षा रेल्वे लोकआंदोलन समितीला वाटते. म्हणूनच खामगाव-जालना रेल्वेमार्गाची सुरूवात करण्यात कोण आडवे आले, याचा खुलासा आजच्या जाहीर सभेत त्यांनी करावा, असे आवाहन रेल्वे लोकआंदोलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Intro:Body:बुलडाणा :- निवडणूक प्रचारात आश्वासनांची खैरात वाटणार्‍या नेत्यांना त्यांच्या जुन्या शब्दांची आठवण करून देणे हे जागरूक नागरिकांचे कर्तव्य आहे. याच भूमिकेतून रेल्वे लोकआंदोलन समितीकडून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना त्यांच्याच जुन्या वाक्याची आठवण करून दिली जात आहे. उध्दव ठाकरे यांनी बरोबर पाच वर्षांंपूर्वी खामगावच्या सभेत " तुम्ही प्रतापराव जाधवांना खासदार म्हणून निवडून द्या, खामगाव - जालना रेल्वेमार्गाच्या मध्ये कोण आडवे येते ते मी बघतोच " असे तोंड भरून आश्वासन दिले होते. पाच वर्षे उलटली तरी या रेल्वेमार्गाचे काम सुरू झाले नाही. शुक्रवार, दि. १२ एप्रिल रोजी खामगाव येथेच प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. त्यामुळे सांगा ना उध्दव साहेब खामगाव - जालना रेल्वेमार्गाच्या मध्ये कोण आडवे आले ते ? असा सवाल रेल्वे लोकआंदोलन समितीने ठाकरे यांना विचारला आहे.

बरोबर पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीची अशीच प्रचार सभा खामगाव येथे दि. ४ एप्रिल २०१४ रोजी आयोजित केली होती. या सभेप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रतापराव जाधव यांना खासदार म्हणून पुन्हा निवडून दिल्यास खामगाव - जालना रेल्वेमार्गाची जबाबदारी आपण स्वीकारणार असे जाहीर केले होते. " हा रेल्वेमार्ग सुरू होण्यात कोण आडवे येते ते मी बघतोच " असा आवेश आणून त्यांनी या रेल्वेमार्गाबद्दल आपण फार संवेदनशील असल्याचे भासवले होते. परंतु खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर ना. प्रतापराव जाधवांनी आपले कर्तव्य पार पाडले ना उध्दव ठाकरे आपल्या शब्दाला जागले. पुन्हा पाच वर्षांनी तेच जुने आश्वासन देऊन उध्दव ठाकरे यांनी मतदारांना मुर्ख बनवू नये अशी अपेक्षा रेल्वे लोकआंदोलन समितीने व्यक्त केली आहे.

उध्दव ठाकरे यांच्या आश्वासनाला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर रेल्वे लोकआंदोलन समितीने गेल्या वर्षी ४ एप्रिल २०१८ पासून चिखली तहसील कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह सुरू केला होता. या आंदोलनाला उत्स्फूर्त जनसमर्थन मिळाले होते. खा. प्रतापराव जाधव यांनी या आंदोलनाला भेट दिली, मात्र काहीच ठोस भूमिका घेतली नाही त्यामुळे जनतेमध्ये नाराजी निर्माण झाली. तत्कालीन कृषी मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. भाऊसाहेब फुंडकर यांनी दिड महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने समितीने हे आंदोलन स्थगित केले. परंतु दुर्दैवाने ४५ दिवसांची मुदत होण्यापूर्वीच भाऊसाहेब फुंडकर यांचे दुर्दैवी निधन झाल्याने हा विषय पुन्हा रेंगाळत पडला.

बुलडाणा जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी केवळ पोकळ आश्वासने देऊन काम चालणार नाही तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल याची जाणीव उध्दव ठाकरे यांना असेल अशी अपेक्षा रेल्वे लोकआंदोलन समितीला वाटते. म्हणूनच खामगाव - जालना रेल्वेमार्गाची सुरूवात करण्यात कोण आडवे आले याचा खुलासा आजच्या जाहीर सभेत त्यांनी करावा असे आवाहन रेल्वे लोकआंदोलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बाईट:- प्रा.किशोर वडसे, अध्यक्ष रेल्वे लोकआंदोलन समिती

-वसिम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.