ETV Bharat / state

शेगावची कचोरी झाली ६९ वर्षांची; दर वाढले तरीही लोकांना अजूनही भूरळ - Karan Sharma Kachori Center shegaon

गेल्या ६९ वर्षात ही कचोरी जगभरात पोहचली असून शेगाव कचोरी हा आता ब्रँड बनला आहे. स्वादिष्ट पदार्थांची आवड असणाऱ्या खवय्यांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या शेगाव कचोरीला गुणवत्तेसाठी आयएसओ ९००१;२००८ मानांकन प्राप्त झाले आहे.

शेगाव कचोरी
author img

By

Published : Nov 18, 2019, 5:52 PM IST

बुलडाणा- शेगावच्या रेल्वे स्थानकावर १९५० साली तयार करून विकण्यात आलेली कचोरी सुरुवातीला २ आण्याची मिळायची. पुढे ५ पैसे आणि यानंतर टप्प्या-टप्प्याने आणि बदलत्या महागाईच्या काळात आता ही कचोरी ७ रुपयाची झाली आहे. शेगावचा ब्रँड म्हणून ओळख असलेल्या आणि आयएसओ मानांकन मिळालेल्या या कचोरीचे दर वाढत चालले आहेत. मात्र, तिच्या लज्जतदार चवीमुळे खवय्यांची संख्या कमी होताना दिसत नाही.

माहिती देताना शेगाव कचोरी सेंटरचे संचालक करण शर्मा

संत नगरी शेगाव येथील श्री. संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर अनेकांची पावले शेगाव कचोरी सेंटरकडे वळतात. १९५० साली देशाच्या फाळणीनंतर पंजाबमधून शेगावात आलेल्या तिरथराम शर्मा यांनी शेगाव येथे कचोरी सेंटरची स्थापन केले होती. गेल्या ६९ वर्षात ही कचोरी जगभरात पोहचली असून शेगाव कचोरी हा आता ब्रँड बनला आहे. स्वादिष्ट पदार्थांची आवड असणाऱ्या खवय्यांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या शेगाव कचोरीला गुणवत्तेसाठी आयएसओ ९००१;२००८ मानांकन प्राप्त झाले आहे. शेगावच्या रेल्वे स्थानकावर उतरताच खमंग कचोरी खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. शेगावची ही कचोरी हळूहळू विदर्भातच नव्हे तर आता संपूर्ण देशासह परदेशात देखील पोहोचली असून सुमारे ६९ वर्षांचा प्रदीर्घ पल्ला या कचोरीने गाठला आहे.

१९५० साली केली कचोरी सेंटरची स्थापना

५ जून १९५० रोजी कचोरी सेंटर स्थापन करून तिरथराम शर्मा यांनी कुटुंबीयांना कायमस्वरूपी कचोरी व्यवसायाचा मंत्र दिला. यामधे त्यांनी रेल्वे स्टेशनवरील एका स्टॉलवर हॉटेल सुरू केले. १९५० मध्ये आपल्या मुलांच्या मदतीने त्यांनी खास पद्धतीने तयार केलेल्या कचोरीची विक्री सुरू केली. शेगावला संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला या कचोरीने भूरळ घातली आहे. त्यांच्या पुढच्या पिढीने कचोरी निर्मिती आणि विक्रीचा वारसा यशस्वीपणे चालविला असून एकेकाळी एका आण्याला विकणारी ही कचोरी आज ७ रुपये एवढ्या किमतीला विकली जात आहे.

सुरुवातीला ही कचोरी २ आण्याची मिळायची. मात्र, त्यांनतर काळानुरुप किंमत बदलली असली तरी कचोरी मात्र तीच आहे. त्यामुळेच जे भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला येतात ते कचोरीच्या लज्जतदारपणामुळे तिची चव घेण्याचा मोह आवरू शकत नाही. आजवर जपलेली कचोरीची गुणवत्ता आणि तिच्या यशाबाबत बोलताना तिरथराम शर्मा यांचे नातू गगन शर्मा यांनी सांगितले की, दर्जेदार बेसन आणि मैद्याच्या वापराबरोबरच कचोरी बनवताना एका विशिष्ट प्रकारचा मसाला ते आजवर वापरत आले आहेत. परिणामी कचोरीचा दर्जा टिकून राहिला असून त्यामुळे शेगावचे नाव प्रसिद्ध होत असल्याने हेच खरे समाधान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. एक प्रकारे खाद्यप्रेमींच्या जिभेचे चोचले पुरवणारी टी.आर. शर्मा यांच्या हातची चव घेऊन आलेली कचोरी या घटकेला अनेकांचे पोट भरण्याचेही साधन ठरली आहे.

कचोरी हा शेगावचा एक प्रतिष्ठित ब्रँड

संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशात शेगाव कचोरीची क्रेझ निर्माण झाली आहे. शेगाव कचोरी हा शेगावचा एक प्रतिष्ठित ब्रँड बनला आहे. दुबई येथील एका हॉटेल कंपनीचा शर्मा यांच्याशी करार झालेला आहे. त्यामुळे शेगाव कचोरी दुबईत पोहोचलेली आहे. यापूर्वी शेगावच्या कचोरीने पाकिस्तान व जपानचा प्रवास केला असून तेथील अनिवासी भारतीयांनी देखील तिची लज्जत चाखली आहे.

राज्यभरात अनेक ठिकाणी शेगाव कचोरीचे स्टॉल

शेगाव कचोरीची वाढती मागणी लक्षात घेता आता राज्यभरात अनेक ठिकाणी शेगाव कचोरीच्या नावाने स्टॉल लावून कचोरी विकण्यास सुरुवात झाली आहे. पण, 'तिरथराम शर्मा' अशी टॅगलाईन असलेल्या आमच्या कचोरीची चव कुणाच्याही हाताला येणार नाही, असा दावा शर्मा यांची नातवंड करतात. आम्ही हळूहळू आमचा पसारा वाढवतो आहे. अगदी लगेचच नाही पण, काही महिन्यात अस्सल शेगाव कचोरी राज्यातील अनेक मोठ्या शहरांमध्ये दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कचोरीला आयएसओ मानांकन

शेगाव येथे काही वर्षांपूर्वी मुंबई येथील एक न्यायाधीश कामानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी गगन शर्मा यांच्या स्टॉलवरील कचोरीचा स्वाद अनुभवला. त्यांनीच शर्मा यांना मानांकनाबाबत सांगितले. शर्मा यांनी या न्यायाधीशांनाच याबाबत मदतीचे आवाहन केले. त्यानंतर न्यायाधीशांनी मानांकन देणाऱ्या संस्थेला कचोरीबाबत कळविले. मार्च २०१३ मध्ये शेगाव कचोरीचे ऑडिट करण्यासाठी खास चमू शेगावात येऊन गेली. गुणवत्ता, सेवा, स्वच्छता आदी निकष तपासल्यानंतर या संस्थेने शेगाव कचोरीला आयएसओ ९००१;२००८ मानांकन दिले आहे.

हेही वाचा- तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा केलीय - रविकांत तुपकर

Intro:Body:

Story : आयएसओ मानांकन कचोरी झाली महाग
कचोरी हा शेगावचा एक प्रतिष्ठित ब्रँड
कचोरी झाली ६९ वर्षाची

बुलडाणा : १९५० साली शेगावच्या रेल्वे स्थानकावर तयार करून विकण्यात आलेली कचोरी सुरुवातीला २ आण्याची मिळायची. पुढे ५ पैसे, आणि या नंतर टप्या टप्याने आणि बदलात्या महागाईच्या काळात आता हि कचोरी ७ रुपयांची झाली आहे. शेगावच्या ब्रँड म्हणून ओळख असलेल्या आणिआयएसओ मानांकन मिळालेल्या या कचोरीचे दर वाढत चालले असले तरी खवय्यांची संख्या मात्र कमी होतांना दिसून येत नाही.
संत नागरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर अनेकांची पावलं शेगाव कचोरी सेंटरकडे वळतात. 1950 साली देशाच्या फाळणीनंतर पंजाबमधून शेगावात आलेल्या तिरथराम शर्मा यांनी शेगाव येथे कचोरी सेंटर स्थापन केले होते. गेल्या ६९ वर्षात ही कचोरी जगभरात पोहचली असून शेगाव कचोरी हा आता ब्रँड बनला आहे. स्वादिष्ट पदार्थांची आवड असणाऱ्या खवय्यांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या शेगाव कचोरीला गुणवत्तेसाठी आयएसओ 9001;2008 मानांकन प्राप्त झाले आहे. शेगावच्या रेल्वे स्टेशनवर उतरताच खमंग कचोरी खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. शेगावची ही कचोरी हळूहळू विदर्भातच नव्हे तर आता संपूर्ण देशासह परदेशात सर्वत्र पोहोचली असून सुमारे ६९ वर्षांचा प्रदीर्घ पल्ला या कचोरिने गाठला आहे. 5 जून 1950 रोजी कचोरी सेंटर स्थापन करून तिरथराम शर्मा यांनी कुटुंबीयांना कायमस्वरूपी व्यवसायाचा मंत्र दिला. यामधे त्यांनी रेल्वे स्टेशनवरील एका स्टॉलवर हॉटेल सुरू केले. १९५० मध्ये आपल्या मुलांच्या मदतीने त्यांनी खास पद्धतीने तयार केलेल्या कचोरीची विक्री सुरू केली. शेगावला संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला या कचोरीने भूरळ घातली आहे. त्यांच्या पुढच्या पिढीने हा कचोरी निर्मिती आणि विक्रीचा वारसा यशस्वीपणे चालविला असून एकेकाळी एका आण्याला विकणारी ही कचोरी आज ७ रुपये एवढ्या किमतीला विकली जात आहे. सुरुवातीला हि कचोरी २ आण्याची पैस्याची मिळायची मात्र त्यांनतर काळानुरुप किंमत बदलली असली तरी कचोरी मात्र तीच आहे. त्यामुळेच जे भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येतात. येथे येणारा प्रत्येक जण कचोरीच्या लज्जतदारपणामुळे ती आपल्या गावालाही नेण्याचा मोह आवरू शकत नाही. आजवर जपलेली कचोरीची गुणवत्ता आणि यशाबाबत बोलताना तिरथराम शर्मा यांचे नातू गगन शर्मा यांनी सांगितले की, दर्जेदार बेसन आणि मैद्याच्या वापराबरोबरच कचोरी बनवताना एका विशिष्ट प्रकारचा मसाला ते आजवर वापरत आले आहेत. परिणामी कचोरीचा दर्जा टिकून राहिला असून या कचोरीमुळे शेगावचे नाव जागोजागी निघत असल्याने तेच खरे समाधान असल्याचीही प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली आहे.एक प्रकारे खाद्यप्रेमींच्या जिभेचे चोचले पुरवणारी टी. आर. शर्मा यांच्या हातची चव घेऊन आलेली कचोरी या घटकेला अनेकांचे पोट भरण्याचेही साधन ठरली आहे. मागील महिना १५ दिवसांपासून आता पर्यंत ६ रुपयांची मिळणारी कचोरी आता ७ रुपयांची झाली आहे.

. कचोरी हा शेगावचा एक प्रतिष्ठित ब्रँड
संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशात शेगाव कचोरीची क्रेझ निर्माण झाली आहे. शेगाव कचोरी हा शेगावचा एक प्रतिष्ठित ब्रँड बनला आहे. दुबई येथील एका होटेल कंपनीशी शर्मा यांच्याशी करार झालेला आहे. हि शेगाव कचोरी दुबईत पोहोचलेली आहे. यापूर्वी पाकिस्तान व जपानचा प्रवास तिने केला असून तेथील अनिवासी भारतीयांनी तिची लज्जत चाखलेली आहे.

. राज्यभरात अनेक ठिकाणी शेगाव कचोरीचे स्टॉल
शेगाव कचोरीची वाढती मागणी लक्षात घेता आता रान्याभरात अनेक ठिकाणी शेगाव कचोरीच्या नावाने स्टॉल लावून कचोरी विकण्यास सुरुवात झाली आहे. पण, तिरथराम शर्मा अशी टॅगलाईन असलेल्या आमच्या कचोरीची चव कुणाच्याही हाताला येणार नाही असा दावा शर्मा यांची नातवंड करतात. आम्ही हळूहळू आमचा पसारा वाढवतोय. अगदी लगेचच नाही पण काही महिन्यांत अस्सल शेगाव कचोरी राज्यातील अनेक मोठी शहरांमध्ये दाखल होणार असल्याचे सांगतात.

. कचोरीला आयएसओ मानांकन
शेगाव येथे काही वर्षापूर्वी मुंबई येथील एक न्यायाधीश कामानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी गगन शर्मा यांच्या स्टॉलवरील कचोरीचा स्वाद अनुभवला. त्यांनीच शर्मा यांना मानांकनाबाबत सांगितले. शर्मा यांनी या न्यायाधीशांनाच याबाबत मदतीचे आवाहन केले. त्यानंतर या न्यायाधीशांनी मानांकन देणाऱ्या संस्थेला कचोरीबाबत कळविले. मार्च २०१३ मध्ये शेगाव कचोरीचे ऑडिट करण्यासाठी खास चमू शेगावात येऊन गेली. गुणवत्ता, सेवा, स्वच्छता आदी निकष तपासल्यानंतर या संस्थेने शेगाव कचोरीला आयएसओ 9001;2008 मानांकन दिले आहे.

बाईट - कारण शर्मा (संचालक)

- फहीम देशमुख, शेगाव
मोबा -9922014466
---------------------------------------------------------Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.