बुलडाणा - जिल्ह्यातील शेगाव शहरात पुरवठा करण्यात येणारे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा धक्कादायक अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे शेगाव नगरपरिषदेत एकच खळबळ उडाली आहे. हा अहवाल प्राप्त होताच नगर परिषदेकडून शहर व परिसरातील लिकेजेस काढण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
गोळा करण्यात आलेल्या नमुन्यामध्ये धक्कादायक बाब समोर आली असून शहराला केला जाणारा वाण धरणातील पाणी पुरवठा हा पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल नगर परिषदेकडे व तक्रारकर्त्या नागरिकांना नुकताच प्राप्त झाला असून यामुळे नगर परिषद प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. यामुळेच नगर परिषद प्रशासनाने शुद्ध पाणीपुरवठा नागरिकांना करण्यात यावा त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी नगरपरिषदेने दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत.