ETV Bharat / state

बुलडाणा : शेगावच्या मुख्य रस्त्यावरील 'ड्रेनेज'काम संथ गितीने, नागरिकांमध्ये रोष

मागील अनेक दिवसांपासून मलनिस्सारणाचे पाईप टाकण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने शेगावच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

सुरु असलेले काम
सुरु असलेले काम
author img

By

Published : Feb 5, 2020, 11:21 AM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील शेगाव शहरातील विकास आराखड्यातील काम संपता-संपेना या शहरात मागील 10 वर्षांपासून आराखड्याच्या नावाने कामे सुरू आहे. मात्र, कामात नियोजनांचा अभाव असल्याने याचा फटका येथील नागरिकांना बसत आहे. असा प्रकार सध्या शहरातील मुख्य रस्त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत (मजीप्रा) होणाऱ्या कामामुळे होत आहे.

बोलताना स्थानिक व्यापारी

शेगाव शहरातील लखपती गल्ली परिसरातील भूगटार योजनेच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मजीप्रामार्फत मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींसह नागरीकांनी या आधीच केला आहे. मात्र महाराजा अग्रसेन चौक ते छत्रपती शिवाजी चौक दरम्यान एका बाजूचा पूर्ण रस्ता जीवन प्राधिकरणाने मागील 20 दिवसांपासून खोदून ठेवला आहे. कामाचा दर्जा आणि कामाची गती अत्यंत धीमी असून नियोजन नसल्याने एकच काम 3 ते 4 वेळा केले जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आणि व्यापाऱ्यांचे धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले असून रस्ता बंद करण्यात आल्याने या भागातील व्यवसायही ठप्प झाले आहेत.

हेही वाचा - खामगाव-नांदुरा महामार्गावरील बनावट डांबराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पाच आरोपी ताब्यात

यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या उपविभागीय अभियंता कानडे या साईटवर आल्या असता नागरिकांनी त्यांना घेराव घालून विविध प्रश्‍नांची सरबत्ती केली व रोष व्यक्त केला. यावेळी या प्रभागाचे नगरसेवक शरदसेठ अग्रवाल, नगरपालिकेचे मुख्याधिकारी शेळके, अभियंता मोकासरे यांचीही उपस्थिती होती. यावेळी नागरिकांनी या कामामुळे रस्त्यावर उडणार्‍या धुळीमुळे श्‍वसन प्रक्रियेला त्रास होत असल्याचे सांगितले. आणखी किती दिवस सहन करायचा हा प्रश्‍न करीत कंत्राटदाराकडून दर्जेदार काम होत नसल्याचाही आरोप यावेळी नागरीकांनी केला आहे. तर नागरीकाच्या आरोपात तथ्य असल्याचे सांगून या प्रभागाचे नगरसेवक शरदसेठ अग्रवाल यांनी सद्यस्थितीत सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे म्हटले आहे. त्यामूळे या कामामध्ये वापरल्या जाणार्‍या साहित्याची मजीप्रा अधिकार्‍यांनी तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच झालेली कामे वारंवार तोडून कोट्यवधीचे नुकसान केले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

हेही वाचा - बुलडाण्यात दुचाकीची एसटीला धडक; दोन जण जखमी

जीवन प्राधिकरणाकडे अपूरी यंत्रणा

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून हे काम कंत्राटदारामार्फत करवून घेतले जात आहे. मात्र, या विभागाकडे पुरेशी यंत्रणा नसल्याने सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामाकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. कारण दररोज कामावर आपला कोणताही कर्मचारी हजर राहू शकत नसल्याचे खुद्द महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी कबूल केले आहे. त्यामुळे कामाचा दर्जा कितपत राखला जाईल हा प्रश्‍न निर्माण होतो.

शिवाजी चौकात चारही बाजूने वाहतूक जाम

लखपती गल्लीतील सांडपाणी व मलनिस्सारण योजनेच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी शहरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर खोदकाम करून पाईपलाईन टाकण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून करण्यात येत आहे. हे काम सुरू असल्यामुळे या रस्त्यावरील एक बाजू रहदारीसाठी बंद झाली आहे. त्यामूळे संपुर्ण वाहतूकीचा भार एकाच रस्त्यावर आला आहे. त्यामूळे या रस्त्यावर वारंवार वाहतूक खोळंबत आहे. मात्र, मंगळवार (दि 4 फेब्रुवारी) बाजाराचा दिवस असल्याने या रस्त्यावर दुपारी 2 वाजतापासून वाहतूक खोळंबण्यास सुरुवात झाल्यानंतर सायंकाळपर्यंत ही वाहतूक सुरळीत झाली नव्हती. तर या खोळंबलेल्या वाहतूकीत अडकलेल्या वाहनचालकांच्या वेळेचा अपव्यय झाल्याने त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न केले जात होते. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज चौक व महाराजा अग्रसेन चौकादरम्यानच्या रस्त्यावर एकेरी वाहतूक असल्याने वाहतूक पोलिसांनाही वाहतूक सुरळीत करण्यात अपयश येत होते.

हेही वाचा - जालन्यात मारहाण झालेल्या 'त्या' पीडित प्रेमीयुगुलाने थाटला संसार..बुलडाण्यातील मंदिरात केले लग्न

Intro:Body:mh_bul_The work of the Sewage Treatment Plant scheme is halted_10047

Story : मुख्य रस्त्यावरील भूगटार योजनेचे काम रेंगाळले !
व्यापाऱ्यांचे व्यवसाय ठप्प : मजीप्रा अधिकार्‍यांविरूध्द रोष"

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील विकास आराखड्यातील काम संपता-संपेना या शहरात मागील १० वर्षांपासून आराखड्याच्या नावाने कामे सुरु आहे. मात्र कामात नियोजनांचा अभाव आल्याने याचा फटका थेट येथील नागरिकांना आणि त्यांच्या आरोग्याला बसत आहे. असा प्रकार सध्या शहरातील में रोडवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत होणाऱ्या कामात होत आहे.
शेगांव शहरातील लखपती गल्ली परिसरातील भूगटार योजनेच्या पाण्याचा निचरा होण्याकरीता मजीप्रामार्फत मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींसह नागरीकांनी या आधीच केला आहे. मात्र श्री.अग्रसेन चौक ते छत्रपती शिवाजी चौक दरम्यान एका बाजूचा पूर्ण रस्ता जीवन प्राधिकरणाने मागील २० दिवसांपासून खोदून ठेवला आहे.कामाचा दर्जा आणि कामाची गती अत्यंत धीमी असल्याने या शिवाय नियोजन नसल्याने एकच काम ३ ते ४ वेळा केल्या जात असल्याने या भागातील नागिकांचे आणि व्यापाऱ्यांचे धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले असून रस्ता बंद करण्यात आल्याने या भागातील व्यवसायही ठप्प पडले आहे. यामध्ये मजीप्राच्या उपविभागीय अभियंता श्रीमती कानडे मॅडम ह्या साईटवर आल्या असता नागरीकांनी त्यांना घेराव घालून विविध प्रश्‍नांची सरबत्ती केली व रोष व्यक्त केला. यावेळी या प्रभागाचे नगरसेवक शरदसेठ अग्रवाल, न.प.मुख्याधिकारी शेळके, अभियंता मोकासरे यांचीही उपस्थिती होती. यावेळी नागरीकांनी या कामामूळे रस्त्यावर उडणार्‍या घुळीचा श्‍वसन प्रक्रियेला त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या. सोबतच कामाची गती अतिशय संथ असल्याने हा त्रास पुढे किती दिवस सहन करायचा हा प्रश्‍न करीत कंत्राटदाराकडून दर्जेदार काम होत नसल्याचाही आरोप यावेळी नागरीकांनी केला आहे. तर नागरीकाच्या आरोपात तथ्य असल्याचे सांगून या प्रभागाचे नगरसेवक शरदसेठ अग्रवाल यांनी सद्यस्थितीत सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे म्हटले आहे. त्यामूळे या कामामध्ये वापरल्या जाणार्‍या साहित्याची मजीप्रा अधिकार्‍यांनी तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच झालेली कामे वारंवार तोडून कोट्यावधीचे नुकसान केल्या जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

चौकट -
जीवन प्राधिकरणाकडे अपूरी यंत्रणा

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून हे काम कंत्राटदारामार्फत करवून घेतल्या जात आहे. मात्र या विभागाकडे आवश्यक तेवढी यंत्रणा नसल्याने सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामाकडे व्यवस्थित लक्ष दिल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. कारण दररोज कामावर आमचा कोणताही कर्मचारी हजर राहू शकत नसल्याचे खुद्द मजीप्रा अधिकार्‍यांनी कबूल केले आहे. त्यामूळे कामाचा दर्जा कितपत राखला जाईल हा प्रश्‍न येथे निर्माण होतो. अशा प्रतिक्रीया नागरीकांकडून ऐकावयास मिळत आहेत.

चौकट -
. शिवाजी चौकात चारही बाजूने वाहतूक जाम
स्थानिक लखपती गल्लीतील सांडपाणी व मलनिस्सारण योजनेच्या पाण्याचा निचरा करण्याकरीता शहरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर खोदकाम करून पाईपलाईन टाकण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून करण्यात येत आहे. सदरहु काम सुरू असल्यामूळे या रस्त्यावरील एक बाजू रहदारीसाठी बंद झाली आहे. त्यामूळे संपुर्ण वाहतूकीचा भार एकाच रस्त्यावर आला आहे. त्यामूळे या रस्त्यावर वारंवार वाहतूक खोळंबत आहे. मात्र आज मंगळवार बाजाराचा दिवस असल्याने या रस्त्यावर दुपारी 2 वाजतापासून वाहतूक खोळंबण्यास सुरूवात झाल्यानंतर सायंकाळपर्यंत सदरहु वाहतूक सुरळीत झाली नव्हती. तर या खोळंबलेल्या वाहतूकीत अडकलेल्या वाहनचालकांना त्यांच्या अमूल्य वेळेचा अपव्यय झाल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक सुरळीत करण्याकरीता वाहतूक पोलीसांकडून प्रयत्न केल्या जात होते. मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौक व महाराजा अग्रसेन चौक दरम्यानचा रोड वन-वे सुरू असल्याने वाहतूक पोलीसांना सुध्दा वाहतूक सुरळीत करण्यात अपयश येत होते.

बाईट - व्यापारी

- फहीम देशमुख खामगाव (बुलडाणा)
कोड - Mh_Bul_10047
मोबाईल -9922014466Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.