ETV Bharat / state

Buldhana Crime: बोरी आडगाव येथे शेतातील घरावर सशस्त्र दरोडा; कुटुंबातील चार जण जखमी

जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव येथे शेतात राहत असलेल्या घरावर दरोडा पडल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी रात्री दहा ते अकराच्या सुमारास घडली आहे. यामध्ये एका कुटुंबातील महिलांसह पुरुषावर चाकूने वार केल्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. पुढील उपचारार्थ खामगाव सामान्य रुग्णालयात येथे हरवण्यात आले आहे. ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

Buldhana Crime News
शेतातील घरावर सशस्त्र दरोडा
author img

By

Published : May 31, 2023, 10:10 PM IST

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे.जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथील एका शेतातील घरावर सात ते आठ जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकला. तसेच चाकूच्या धाकावर सोने नाणे आणि रोख रकमेची लूट केली. यात एका युवकासह दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनची पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

चाकूचा धाक दाखवून हल्ला: याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव येथील शेत शिवारात असलेल्या तायडे यांच्या घरावर, दुचाकीने आलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी चाकूच्या धाक दाखवून हल्ला केला. महिलांच्या अंगावरील दागिने काढत पैशांची लूट केली. यावेळी घरातील काही महिलांनी प्रतिकार केला. दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकू हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत एका चोवीस वर्षीय युवकांसह दोन महिला गंभीर जखमी झाल्या.

गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले: जखमींमध्ये वैभव मारुती तायडे, ज्योती मारुती तायडे, सुदाबाई विजय तायडे, यांचा समावेश असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे देखील हजर झाले. जखमींना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी गुन्ह्यात वापरलेली एम एच २८-१८७९ या क्रमांकाची दुचाकी आढळून आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

बुलढाणा येथे गळा आवळून खून: याआधी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात ४ दिवसा पूर्वी सहा वर्षीय चिमुकलीची हत्या झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. चिखली तालुक्यातील रोहडा येथे तपोवन देवी संस्थानात आपल्या आई वडिलांसोबत लग्नाला आलेल्या या चिमुकलीची का व कुणी हत्या केली असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर चौथ्या दिवशी पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले होते. रोहडा गावातीलच एका 24 वर्षीय नराधमाने या चिमुकलीला खाऊ देण्याच्या बाहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. केलेले कृत्य कुणाला माहित पडू नये म्हणून तिचा रुमालाने गळा आवळून खून केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.