ETV Bharat / state

कामकाजात अनियमतता असल्याचा ठपका; मलकापूर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे मुख्यालय असलेल्या मलकापूर अर्बन बँकेवर ( Malkapur Urban Bank ) काल रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. कामकाजात अनियमितता असल्याचा ठपका या बँकेवर ठेवण्यात आला आहे.

author img

By

Published : Nov 25, 2021, 12:53 PM IST

Reserve Bank Restrictions on Malkapur Urban Bank buldana
मलकापूर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध

बुलडाणा - जिल्ह्यातील मलकापूर अर्बन बँकेवर ( Malkapur Urban Bank ) रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावले आहेत. ( Reserve Bank Restrictions on Malkapur Urban Bank ) यामुळे पुढील सहा महिने ग्राहक बँकेतून फक्त दहा हजार रुपयेच काढू शकणार आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या बँकेचे अध्यक्ष भाजपा नेते व मलकापूर विधानसभेचे माजी आमदार चैनसुख संचेती हे आहेत. ( Chainsukh Sancheti President of Malkapur Urban Bank)

Reserve Bank Restrictions on Malkapur Urban Bank buldana
मलकापूर अर्बन बँकेवर निर्बंधाबाबत रिझर्व्ह बँकेची प्रेस रिलीज

निर्बंध का?

जिल्ह्यातील मलकापूर येथे मुख्यालय असलेल्या मलकापूर अर्बन बँकेवर काल रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्याने जिल्ह्यासह खान्देश, मराठवाडा भागात प्रस्थ असलेल्या मलकापूर अर्बन बँकेच्या ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. मलकापूर अर्बन बँकेला याआधी देखील केवायसी अनियमितता बद्दल दोन लाखांचा दंड झाला आहे. याआधी 2008 साली बँकेवर स्थानिक ग्राहकाने रिझर्व्ह बँकेकडे तक्रार केली होती. कामकाजात अनियमितता असल्याचा ठपका ठेवला आहे. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - Buldana Urban : आयकर विभागाचा छापा नसून खात्यांची चौकशी, ठेवी सुरक्षित - राधेश्याम चांडक

मलकापूर अर्बन बँकेबद्दल -

  1. मलकापूर अर्बन बँकेच्या राज्यात मुख्य कार्यालय व 28 शाखा आहेत.
  2. मलकापूर अर्बन बँकेत 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी आहेत.
  3. बँकेचे खान्देश, मराठवाडा, विदर्भात मोठे प्रस्थ आहे.
  4. पुणे, औरंगाबाद, नागपूर, अकोला, वर्धा या शहरात शाखा आहेत.
  5. बँकेचे वेअर हाऊससुद्धा आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.