ETV Bharat / state

शेतकऱ्यांनी हिंसा घडवल्याचे चित्र केंद्र सरकार तयार करतेय - तुपकर

शेतकरी मेला तरीही चालेले. पण, अंबानी, अदानी जिवंत राहिला पाहिजे, असे केंद्र सरकारच धोरण आहे. केंद्र सरकारने काहीही केले तरी शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन पुढे नेतील, असा विश्वास शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला आहे.

रविकांत तुपकर
रविकांत तुपकर
author img

By

Published : Jan 26, 2021, 6:42 PM IST

Updated : Jan 27, 2021, 7:38 PM IST

बुलडाणा - अतिशय शांततेच्या मार्गाने मोर्चा करणाऱ्या शेतकऱ्यांवर आज (दि. 26 जाने.) गोळीबार झाला.अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या आणि शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला गेला. ही घटना अतिशय निंदनीय असून तीव्र शब्दात या घटनेचा आम्ही निषेध करतो. पण, केंद्र सरकारला या आंदोलनामध्ये हिंसा घडवून आणायची असून शेतकऱ्यांच्या डोक्यावर खापर फोडायचा आहे. जेणेकरून शेतकऱ्यांनी हिंसा घडवली आहे, असा चित्र केंद्र सरकार तयार करत आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे.

...तरीही शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन पुढे नेतील

शेतकरी मेला तरीही चालेले. पण, अंबानी, अदानी जिवंत राहिला पाहिजे, असे केंद्र सरकारच धोरण आहे. केंद्र सरकारने काहीही केले तरी शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन पुढे नेतील हे केंद्र सरकारने लक्षात ठेवावे, असेही तुपकरांनी सांगितले.

देशातील जनता सरकारचा माज उतरवेल

इंदिरा गांधींच्या पराभव देखील या देशातील सर्वसामान्य जनतेला केलेला आहे. कुठल्याही सरकारमध्ये जर अहंकार आणि मस्ती आली की देशातील सामान्य माणूस सरकारचा माज उतरवतो. म्हणून येणाऱ्या काळामध्ये शेतकरी केंद्र सरकारला खाली खेचतील, असेही रविकांत तुपकर म्हणाले.

Last Updated : Jan 27, 2021, 7:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.