ETV Bharat / state

Buldhana Bus Accident: सर्वात मोठ्या अपघाताच्या मृतदेहांची चिता जळत असताना शपथविधीचा घाट का-विरोधकांची सरकारवर टीका - Ravikant Tupkar

बुलढाण्यातील सिंदखेड राजाजवळ समृद्धी महामार्गावर शनिवारी झालेल्या भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. अपघातातील सर्व मृतकांवर आज सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. परंतु यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे कमी वेळ हजर राहिले, म्हणून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Buldhana bus accident
रविकांत तुपकर यांची गुलाबराव पाटलांवर टीका
author img

By

Published : Jul 3, 2023, 8:58 AM IST

रविकांत तुपकर यांची गुलाबराव पाटलांवर टीका

बुलढाणा : शनिवारी बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा सिंदखेड राजाजवळ समृद्धी मार्गावर खाजगी लक्झरी बसला अपघात होऊन 25 जण मृत्युमुखी पडले होते. यानंतर संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात याचे पडसाद उमटले होते. संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील घटनास्थळाला तातडीने भेट दिली. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले गुलाबराव पाटील हे फक्त एका फ्लाईंग विझिट सारखे आले व निघून गेले, असे शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हटले आहेत.

गिरीश महाजन उपस्थित : मंत्री गिरीश महाजन हे एका कार्यकर्त्यासारखे नातेवाईकांपासून प्रशासनाला एक संघ ठेवण्याचे काम करत होते. प्रत्येक नातेवाईकाची आपुलकीने विचारपूस करत होते. त्यांची येण्याची, राहण्याची व्यवस्था तसेच सामूहिक अंत्यसंस्कार बुलढाण्यात होण्याकरिता सर्व नातेवाईकांचे एकमत करण्यामध्ये गिरीश महाजन यांचे मोठे पाऊल होते. तसेच आज देखील अंत्यसंस्कारासाठी गिरीश महाजन हे उपस्थित असताना जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र पाठ फिरवल्याचे चित्र असल्याचे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.

'असा' झाला होता अपघात : समृद्धी महामार्गावरून विदर्भ ट्रॅव्हल्सची बस पुण्याकडे जाताना सिंदखेडराजाजवळ आली होती. त्याचवेळी चालकाच्या बाजूचे टायर अचानक फुटले होते. त्याचे बसवरील नियंत्रण सुटले होते. यानंतर बस डिवायडरला धडकली होती. त्यामुळे बसच्या डिझेल टँकचा स्फोट झाला होता. या स्फोटानंतर भीषण आग लागली होती. यात 25 जणांचा जळून मृत्यू झाला होता. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रॅव्हल्सच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आयुष गाडगे, कौस्तुभ काळे, कैलास गंगावणे, इंशांत गुप्ता, गुडीया शेख, अवंती, पोहनकर, संजीवनी गोटे, प्रथमेश खोडे, श्रेया वंजारी, वृक्षाली वनकर, ओवी वनकर, शोभा वनकर या व्यक्तींची आतापर्यंत ओळख पटलेली आहे.

राज्यातील सर्वात मोठ्या अपघाताच्या मृतदेहांची चिता जळत असताना शपथविधीचा घाट- बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी मार्गावर राज्यातील एक मोठा अपघात खासगी बसला झाल्यानंतर 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिस्थितीची माहिती यंत्रणेकडे जाणून घेतली. समृद्धी मार्गावर काय उपाय योजना करता येतील यावर निश्चित विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. पण त्यानंतर लगेचच राज्यात आज एक राजकीय भूकंप घडत राष्ट्रवादीचे अजित पवार व त्यांचे 30 ते 35 आमदार भाजप शिंदे गटासोबत सरकारमध्ये सामील झाले. यावर आता काँग्रेसकडून आरोप करण्यात येत आहे की राज्यांमध्ये एवढी मोठी दुर्घटना घढल्यानंतर सरकारला उपाययोजना करण्याकरता वेळ नाही. अपघातात मृत पावलेल्यांची चिता जळत असताना ती शांत होण्यापूर्वीच हा शपथविधीचा घाट का घातला असा महाराष्ट्र प्रदेश सचिव काँग्रेसच्या जयश्री शेळके यांनी विचारला आहे.

हेही वाचा :

  1. Buldhana Bus Accident: अपघातातील २४ मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार, एक मृतदेह नातेवाईकांकडे सोपविला, स्मशानभूमिला छावणीचे स्वरुप
  2. Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर झालेली दुर्घटना दुर्दैवी, अशोक चव्हाणांची भाजपवर टीका
  3. Buldhana Bus Accident : अपघातातील 24 मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार; आमदार संजय गायकवाड यांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.