बुलडाणा - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील 4 लघु धरणे 100 टक्के भरली आहेत. या भरलेल्या धरणांचे स्वयंचलित दरवाजे उघडले असून सध्या हजारो लिटर पाण्याच्या विसर्ग होत आहे. दिल्ली हवामान खात्याकडून या ठिकाणी 9 ऑगस्ट पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील 4 लघु धरणे 100 टक्के भरली
बुलडाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव येथील 'भोंडे जलाशय' या धरणाचा समावेश होतो. यामुळेच बुलडाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तर भरलेल्या धरणांचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले असून सध्या हजारो लिटर पाण्याच्या विसर्ग केला जात आहे.
बुलडाणा जिल्ह्यात यावर्षी सरासरी एकूण 406.4 मिलिमीटर पाऊस पडला असून मागच्या वर्षी यापेक्षा कमी म्हणजे सरासरी 256.6 मिलिमीटर पाऊस पडला होता. जिल्ह्यातील ४ लघु प्रकल्पांपैकी येळगाव, करडी, दहित आणि मातला ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. करडी धरणाच्या आणि येळगाव धरण्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्ग होत आहे. बुलढाण्यात मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पाऊस सुरू असून दिल्ली हवामान खात्याकडून बुलडाणा जिल्ह्यात 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट पर्यन्त अतिउष्टीचा इशारा देण्यात आला आहे.