बुलडाणा - राज्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. हे अचानक आलेले संकट आहे. याामध्ये सामान्य माणसाचा काहीही दोष नाही. शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन नाही. त्यामुळे जनतेला खासगी रुग्णालयात उपचार करण्याची वेळ आली आहे. दोन वर्षांपासून असलेल्या कडक निर्बंधांमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. उदयोग धंदे नाही, यामुळे सध्याच्या स्थितीत सामान्य जनतेकडे खासगी कोविड रुग्णालयात उपचारासाठी पैसा नाही, त्यामुळे राज्यातील सर्व खासगी कोविड रुग्णालयांना अधिग्रहीत करून त्यांना शासकीय रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा. तसेच या रुग्णालयात राज्यातील कोरोना रुग्णांचे उपचार मोफतमध्ये करून त्याचे बिले 50 टक्के राज्य सरकारने आणि 50 टक्के केंद्र सरकारने करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.
हेही वाचा - मृत्यूनंतरही भोग सरेना.. धुळ्यात मृतदेहाच्या खिशातले पैसे लांबवले, घटना सीसीटीव्हीत कैद