बुलडाणा - लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत शिवसेना पक्षाचे उमेदवार प्रतापराव गणपतराव जाधव यांनी ५ लाख २१ हजार ९७७ मते मिळवून विजय संपादन केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे यांना ३ लाख ८८ हजार ६९० मते मिळाली आहेत. प्रतापराव जाधव यांना त्यांच्यापेक्षा १ लाख ३३ हजार २८७ अधिक मते मिळाली आहेत.
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ निरूपमा डांगे यांनी हा निकाल जाहीर केला. केंद्रीय निवडणूक निरीक्षक भुपेंदर सिंग, नरेंद्रकुमार डुगा यावेळी उपस्थित होते. यावेळी विजयी उमेदवार प्रतापराव जाधव यांना जिल्हा निवडणूक अधिकाऱयांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
मतमोजणीच्या एकूण २७ फेऱ्या पार पडल्या. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ निरूपमा डांगे यांच्याकडून फेरीनिहाय आकडेवारी जाहीर करण्यात आली. २७ वी फेरी आटोपल्यानंतर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. डांगे यांच्याकडून निकाल जाहीर करण्यात आला.
इतर उमेदवारांना मिळालेली मते -
बळीराम भगवान सिरस्कार - १ लाख ७२ हजार ६२७ (वंचित बहुजन आघाडी )
अब्दुल हफीज अब्दुल अजीज - ६५६५ मते (बहुजन समाज पार्टी)
प्रताप पंढरीनाथ पाटील - ४३०७ ( बहुजन मुक्ती पार्टी )
अनंता दत्ता पुरी - १८९५ ( अपक्ष )
गजानन उत्तम शांताबाई - १२६४ (अपक्ष)
दिनकर तुकाराम संबारे - ४१६२ (अपक्ष )
प्रवीण श्रीराम मोरे - २२४५ ( अपक्ष )
वामनराव गणपतराव आखरे - १८५३ ( अपक्ष)
भाई विकास प्रकाश नांदवे - ४११७ (अपक्ष)
विजय बनवारीलालजी मसानी - २९७६ (अपक्ष)