ETV Bharat / state

बुलडाण्यात पोलीस पब्लिक शाळा बंद; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, पालकांचे पाल्यांसह उपोषण

author img

By

Published : Jun 25, 2019, 5:40 PM IST

Updated : Jun 25, 2019, 7:27 PM IST

जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या निर्णयामुळे १२४ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांवर गदा येणार असल्याचे चित्र आहे. तसेच शाळेत पोलिसांचे पाल्य कमी असून शाळा तोट्यात चालत आहे, असे म्हणत शाळा बंद करत असल्याचे पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे. मात्र, याबाबत त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.

बुलडाण्यात पोलीस पब्लिक शाळा अचानक बंद

बुलडाणा - पोलीस वेल्फेअरमार्फत चालविण्यात येणारी पोलीस पब्लिक शाळा अचानक बंद करण्याच्या निर्णय पोलीस अधिक्षकांनी घेतला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर शाळा सुरू होण्याच्या केवळ २ दिवस आधीच ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. याविरोधात पालकवर्गाने शाळा प्रशासनाविरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

बुलडाण्यात पोलीस पब्लिक शाळा बंद

शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नये, यासाठी सोमवार २४ जूनपासून १० पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. शिक्षणमंत्र्यांनी न्याय द्यावा, अशा घोषणा विद्यार्थी देत होते. जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या निर्णयामुळे १२४ विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा येणार आहे, तर शाळेत पोलिसांच्या पाल्यांचे प्रमाण अत्यल्प असून, शाळा तोट्यात चालत असल्याचा ठपका ठेवत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे पोलीस अधीक्षकांचे म्हणणे आहे, मात्र याबाबत त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. बुलडाण्यात पोलीस वेल्फेअरमार्फत चालविल्या जाणाऱ्या पोलीस पब्लिक शाळेत नर्सरीसह इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत १२४ विद्यार्थीं शिक्षण घेत असून ११ शिक्षकांसह २ अन्य कर्मचाऱ्याचा स्टाफ आहे. शाळेतील मुख्यध्यापिका यांनी पालकसभा बोलावून शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या काही दिवसपूर्वीच जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या आदेशाने शाळा बंद होत असल्याचे पोलीस वेल्फेअरकडून पालकांना सागंण्यात आल्यामुळे पालकवर्गामध्ये एकच गोंधळ उडाला. शैक्षणिक सत्र सुरू होण्यास केवळ दोन दिवस आहेत १२४ विद्यार्थ्यांना अचानक प्रवेश मिळणे अशक्य आहे. त्यामुळे शाळा बंद न करण्याचे निवेदन पालकवर्गाने मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, सामाजिक न्यायमंत्रीसह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षकांसह शिक्षणाधिकारी यांना दिले आहे.

पालकांसोबत शाळेतील लहान-लहान विद्यार्थी शिक्षणमंत्र्यांना या शाळा बंद न करण्याची विनंती करीत शिक्षणमंत्री लक्ष द्या, आशा घोषणा देत आहेत. वरिष्ठांकडून दौऱ्याच्या वेळी पोलीस पब्लिक शाळेला भेटी देण्यात आल्या. यादरम्यान शाळेत पोलीस पाल्यांचा अत्यल्प समावेश होता. १२४ विद्यार्थ्यांमध्ये केवळ १८ च पोलिसांचे पाल्य पब्लिक शाळेत शिक्षण घेत आहेत. यामुळे शाळा तोट्यात चालत आल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. यामुळे शाळा बंद करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून आल्याने कार्यवाही करीत असल्याचे सांगितले जात आहे. आत्तापर्यंत शाळेतील शिक्षकांसह कर्मचाऱ्यांचे पगार, २०० अधिकारी, २ हजार ७०० कर्मचाऱ्यांच्या पगारातून देत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी सांगितले आहे.

उपोषणापासून प्राथमिक शिक्षणाधिकारी अनभिज्ञ
पोलीस पब्लिक शाळा बंद करू नये, अशी मागणी करत विद्यार्थ्यांचे पालक आमरण उपोषणाला बसले आहेत. याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा प्राथमिक प्रभारी शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांना विचारल्यानंतर त्यांनी याबाबत आपल्याला कसलीही माहिती नाही. या सांदर्भात एका पालकांचा फोन आला होता. मात्र, याबाबत निवेदन नसल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:Body:बुलडाणा:-बुलडाण्यात पोलीस वेल्फेअर मार्फत चालविण्यात येणाऱ्या पोलीस पब्लिक शाळेला पोलीस अधिक्षकांनी अचानक बंद करण्याच्या निर्णय घेतला आहेत. उन्हाळ्याच्या सुट्या नंतर शाळा उघडण्याच्या केवळ 2 दिवसा अगोदरच शाळा बंदच्या निर्णयामुळे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये एकच गोधळ उडाला आहे.शाळा बंद करू नये व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नये या करिता सोमवार 24 जूनपासून 10 पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.शिक्षणमंत्री यांनी न्याय द्यावा अशी घोषणा उपोषण मंडपात चिमुरळे विद्यार्थी घोषणा करत आहे.जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या निर्णयामुळे 124 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांवर गदा येणार असल्याचे चित्र आहे तर शाळेत पोलिसांचे पाल्यांचे अत्यअल्प असून शाळा तोट्यात चालत असल्याचा ठपका ठेवत शाळा बंद करत असल्याचे पोलीस अधीक्षकांचे म्हणणें आहे मात्र याबाबत त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला...

बुलडाण्यात पोलीस वेल्फेअर मार्फत चालविण्यात जाणाऱ्या पोलीस पब्लिक शाळेत नर्सरी सह इयत्ता 1 ते 7 वी पर्यन्त 124 विद्यार्थीं शिक्षण घेत असुन 11 शिक्षकांसह 2 अन्य स्टाफ आहे.शाळेतील मुख्यध्यापिका यांनी पालकसभा बोलवून शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या काही दिवसाअगोदार जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या आदेशाने शाळा बंद होत असल्याचे सांगितले असल्याचा पालकांना सांगितल्या आलेय चा आरोप पालकांकडून करण्यात आलाय आहे.यामुळे पालकवर्गामध्ये एकच गोधळ उडाला असून शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या दोन दिवसातच 124 विद्यार्थ्यांना कोणत्या शाळेत प्रवेश मिळतील आणि महागळ्या शाळेत प्रवेश घेण्याची ऐपीयत नसून शाळा बंद करू नये ही मागणी घेत पालकवर्गांनी मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, सामाजिक न्यायमंत्रीसह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षकांसह शिक्षणाधिकारी यांना निवेदन देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10 पालकांनी सोमवारी 24 जूनपासून आमरण उपोषण करीत आहे.त्यांच्यासोबत शाळेतील लहान-लहान विद्यार्थी असून त्यांनी देखील शिक्षणमंत्री यांना ही शाळा बंद न करण्याची विनंती करीत शिक्षण मंत्री लक्ष द्या च्या घोषणा करत आहे.तर वरिष्ठांकडून दौऱ्यांच्या वेळी पोलीस पब्लिक शाळेला भेटी दरम्यान शाळेत पोलीस पाल्यांचा अत्यअल्प समावेश असून 124 विद्यार्थ्यांमध्ये केवळ 18 च विद्यार्थी पोलीस पब्लिक शाळेत शिक्षण घेत असून शाळा तोट्यात चालत आल्याचे निर्दशनास आले.यामुळे शाळा बंद करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून आल्याने कार्यवाही करीत असून शाळेला शासकीय अनुदान नसून पोलीस वेल्फेअर मार्फत शाळा चालविली जात आहे. आत्ता पर्यन्त शाळेतील शिक्षकांसह कर्मचाऱ्यांची पेमेंट 200 अधिकारी,2700 कर्मचाऱ्यांच्या सैलरी मार्फत देत असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांनी सांगितलंय.विशेष म्हणजे शाळा बंद करण्यासंदर्भात पोलीस विभागाने प्रशासनाला काहीच माहिती दिली नसून यामुळेच आता एका दिवसात शाळा उघडणार असल्याने 124 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांवर गदा येवून या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे

-उपोषणापासून प्राथमिक शिक्षणाधिकारी अनभिज्ञ-

पोलीस पब्लिक शाळा बंद करू नये ही मागणी घेत पालकवर्गांनी मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, सामाजिक न्यायमंत्रीसह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षकांसह प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देत आमरण उपोषण करीत आहे.याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा प्राथमिक प्रभारी शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांना विचारल्यावर याबाबत त्यांना माहिती नसून या सांदर्भात एका पालकांचा फोन आला होता मात्र याबाबत निवेदन नसल्याचे त्यांनी सांगितले तर अश्या प्रकारे अचानक शाळा बंद करण्यात येते का प्रश्नाच्या उत्तरात म्हटले की शाळा बंद करण्या संदर्भात शिक्षणाच्या आर टी ई 2009 च्या कायद्यामध्ये दिले आहे ते पाहता येईल तर शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवल्या जाणार नाही त्यांचा समायोजन करण्यात येईल असे प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी सांगितलंय मात्र ज्या अधिकाऱ्यांवर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकार आर टी ई 2009 च्या कायद्याची जबाबदारी आहे तेच अधिकारी पोलीस पब्लिक शाळा बंद असल्यासंदर्भात सुरू असलेल्या उपोषण बाबत अनभिज्ञ आहे आणि आता सत्र सुरू होण्याच्या एक दिवसावरच कश्या प्रकारे विद्यार्थ्यांचे समायोजन करता येईल हे पाहण्यासारखे आहे...

पोलीस पब्लिक शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती
वर्ग- पोलीस पाल्य- पब्लिक पाल्य-
Kg 1 5 11
Kg 1 2 8
Kg 2 2 10

वर्ग 1 ला 03 17
वर्ग 2 रा 0 12
वर्ग 3 रा 0 18
वर्ग 4 था 2 15
वर्ग 5 वा 2 5
वर्ग 6 वा 2 7
वर्ग 7 वा। 0 3

बाईट:- 1) विनोद नाटेकर,पालक
2) रमाबाई हिवाळे,पालक
3) त्रिवंतकुमार भिसे,पालक
4) हर्षिता चोपडे,विद्यार्थी
5) अथर्व भालेराव,विद्यार्थी
6) श्रीराम पानझडे, प्रभारी शिक्षणाधिकारी, बुलडाणा

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : Jun 25, 2019, 7:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.