ETV Bharat / state

प्रेम प्रकरणातून हाणामारी करणाऱ्या दोन प्रियकरांना अटक, पिस्तुलासह कोयता जप्त

author img

By

Published : Sep 7, 2019, 11:37 PM IST

प्रेम प्रकरणातून दोन प्रियकरांमध्ये सुरू असलेली हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी दोन्ही प्रियकरांकडून शस्त्रे जप्त केली आहेत. तसेच त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

प्रेम प्रकरणातून हाणामारी करणाऱ्या २ प्रियकरांना अटक

बुलडाणा - प्रेम प्रकरणातून दोन प्रियकरांमध्ये सुरू असलेली हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी दोन्ही प्रियकरांकडून शस्त्रे जप्त केली आहेत. तसेच त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. गणेश लक्ष्मीनारायण तल्लारे (२७) आणि सुभाष कुटे अशी या दोघांची नावे आहेत.

शहरातील भिलवाडा परिसरात ही घटना घडली. एकाच महिलेवर दोघांचे प्रेम असल्याच्या कारणातून या दोघांमध्ये हाणामारी झाली होती. याप्रकरणी पिस्तूल बाळगणारा मूळचा भुसावळ येथील राहणारा व तीन वर्षांपासून बुलडाणा शहरात वास्तव्यास असलेल्या गणेश लक्ष्मीनारायण तल्लारे यास अटक करण्यात आली आहे. एकाच महिलेवर दोघांचे प्रेम असल्याच्या कारणातून हा वाद झाल्याची माहिती आहे. सार्वजनिक उत्सवादरम्यान मोठ्या शिताफीने पिस्तूल पकडल्याने जिल्हा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ-पाटील यांनी शहर पोलीस ठाण्याच्या डीपी पथकाला १० हजाराचा रिवॉर्ड घोषित केला आहे.

गणेश तल्लारे हा जुनागाव भिलवाडा भागातील आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. तिथे तिचा पूर्वीचा प्रियकर सुभाष कुटे (रा. बोराखेडी ता. मोताळा) हजर होता. प्रियसीला भेटण्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. वादातून सुभाष कुटे याने गणेश तल्लारेवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दोघांमधील हाणामारी चांगलीच वाढल्याने आजूबाजूचे नागरिक जमा झाले. त्यांनी याबाबत शहर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच डीबी पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता गणेश तल्लारे याच्या खिशात देशी कट्टा व दोन जीवंत काडतूस आढळून आले.

देशी कट्टा व जीवंत काडतुसासह आरोपी गणेश तल्लारे यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुध्द आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विनित घाटोळ, माधव पेटकर, प्रशांत मोरे यांच्यासह डीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Intro:Body:बुलडाणा:- प्रेम प्रकरणातून दोन प्रियकरांमध्ये सुरु असलेली हाणामारी थंबविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना एका प्रियकरांजवळून देशी कट्टा व दोन जीवंत काडतूस तर दुसऱ्या प्रियकरांकडून कोयता बुलडाणा शहर पोलिसांनी जप्त केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी 6 सप्टेंबरच्या मध्य रात्री शहरातील भिलवाडा परिसरात उघडकीस आला. दरम्यान या प्रकरणी पिस्तुल बाळगणारा मूळचा भूसावळ येथील राहणारा व तीन वर्षांपासून बुलडाणा शहरात वास्तव्यास असलेल्या गणेश लक्ष्मीनारायण तल्लारे (२७) यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान एकाच महिलेवर दोघांचे प्रेम असल्याच्या कारणातून हा वाद झाल्याची माहिती आहे.सार्वजनिक उत्सवादरम्यान मोठ्या शिताफीने पिस्तुल पकडल्याने जिल्हा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी शहर पोलीस स्टेशनच्या डीपी पथकाला दहा हजाराचा रिवॉर्ड घोषित केला आहे

मूळचा भुसावळ येथील व तीन वर्षांपासून बुलडाणा शहरातील संभाजी भगाात राहणारा गणेश तल्लारे हा जुनागाव भिलवाडा भागातील आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. तिथे तिचा पूर्वीचा प्रियकर सुभाष कुटे रा. बोराखेडी ता. मोताळा हजर होता. प्रियसीला भेटण्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. वादातून सुभाष कुटे याने गणेश तल्लारेवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान दोघांमधील हाणामारी चांगलीच वाढल्याने आजूबाजूचे नागरिक जमा झाले. त्यांनी याबाबत शहर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच डीबी पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही युवकांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता गणेश तल्लारे याच्या खिशात देशी कट्टा व दोन जीवंत काडतूस आढळून आले. देशी कट्टा व जीवंत काडतूसासह आरोपी गणेश तल्लारे यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुध्द आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी वरून दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.ठाणेदार शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विनित घाटोळ, माधव पेटकर, प्रशांत मोरे यांच्यासह डीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेईला शहरात घडलेल्या या घटने मुळे खळबळ उडाली आहे..

बाईट:- शिवाजी कांबळे,पोलीस निरीक्षक, बुलडाणा शहर

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.