बुलडाणा - देशातील निमशासकीय पेन्शनधारकांना पेन्शन वाढ मिळावी, यासाठी ईपीएस संघटनेच्यावतीने पेन्शन धारकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३१८ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. मात्र, शासनाकडून पेन्शन धारकांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आज पेन्शन धारकांनी रास्तारोको केला. यावेळी पोलीस आणि पेन्शनधारक एकमेकांशी भिडले.
पेन्शन वाढ मिळावी यासाठी पेन्शन धारकांनी रस्तारोको केला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर लोटलेल्या पेन्शन धारकांना हटविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यामुळे पेन्शनधारक व पोलीस कर्मचारी एकमेकांसोबत भिडले. ही घटना जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोरच घडल्याने परिसरात चांगलाच तणाव व गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, काही वेळातच मध्यस्थी झाल्याने हा वाद मिटला.
हेही वाचा- ...अन्यथा 11 नोव्हेंबर पासून राज्यभर चक्काजाम - आमदार भुयार