ETV Bharat / state

जनतेने कॉंग्रेसला कात्रजचा घाट दाखवला - देवेंद्र फडणवीस - अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

निवडणुकीपुर्वी आरडाओरड करणाऱ्या कॉंग्रेसला जनतेने कात्रज घाट दाखवला आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी कॉंंग्रेसवर केली आहे.

people showed  Katraj Ghat to congress the said devendra fadnavis in buldana
जनतेने कॉंग्रेसला कात्रजचा घाट दाखवला - देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Nov 23, 2020, 3:13 AM IST

बुलडाणा- कोरोनानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय झाला असून निवडणुकीपुर्वी आरडाओरड करणाऱ्या कॉंग्रेसला जनतेने कात्रज घाट दाखवला आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी कॉंंग्रेसवर केली आहे. ते अमरावती विभागाच्या शिक्षक मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार प्रा.नितीन धांडे यांच्या प्रचारार्थ बुलडाण्यातील चिखली येथे आयोजित सभेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

सत्तेसाठी मित्रपक्षाने बेईमानी केली-

राज्यात तुम्ही आम्हालाच निवडून दिले. मात्र, सत्तेसाठी आपल्या मित्रपक्षाने बेईमानी केली आणि नादान पक्षासोबत हातमिळवणी केली, अशी परखड टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली.

सत्तेत असताना मंजूर केला होता शिक्षकांसाठी निधी-

सत्तेत असताना 40 टक्के निधी शिक्षकांसाठी मंजूर केला होता. मात्र, दुर्दुवाने आपले सरकार पुन्हा सत्तेत आले नाही आणि मी मंजूर केलेला निधि सुद्धा या सरकारने वितरित केला नाही, असे शिक्षकांच्या निधी बाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे पुढील काळात आपला विजय नक्की होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा- सत्ता गेल्यापासून चंद्रकांत पाटलांची अवस्था मनोरुग्णासारखी - मुश्रीफ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.