बुलडाणा - जिल्ह्यातील खामगाव शहरातील निर्मल चौकात प्रवाशी बसवण्यावरून दोन ऑटो चालकांमध्ये झालेल्या वादामुळे एका ऑटो चालकाची पोटात धारदार चाकू भोसकून हत्या केल्याची घटना 1 एप्रिलला घडली. मृत्यू झालेल्या ऑटो चालकाचे नाव अजय आवटे असे आहे. तसेच हत्या करणारा मेहरसिंग गोविंदसिंग चव्हाण याला पोलिसांनी अटक केले आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपीने मृताला ऑटोतून नेले रुग्णालयात
खामगाव शहरातील निर्मल टर्निंग जवळील ऑटो स्टॉप वर मेहरसिंग गोविंदसिंग चव्हाण वय 43 व अजय विनायक आवटे वय 40 हे दोघे सती फैल येथे राहतात. या दोघांमध्ये सायंकाळी प्रवाशी घेवून जाण्याच्या कारणावरुन वाद झाला. हा वाद इतर ऑटो चालकांनी मध्यस्थी करत निवळला. परंतु, काही वेळानंतर या दोघांमध्ये पुन्हा वाद उफाळून आला. आरोपी मेहरसिंग चव्हाण याने त्याच्याजवळील धारधार चाकूने अजय आवटे याच्या पोटावर वार केले. यावेळी अजय आवटे हा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. आरोपी मेहरसिंग चव्हाण यानेच अजय आवटे यास स्वतःच्या ऑटोमधून तातडीने सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केले. डाॅक्टरांनी त्याची तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनिल हुड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून सामान्य रुग्णालय येथून पोलिसांनी आरोपी मेहरसिंग चव्हाण यास ताब्यात घेतले. आरोपी मेहरसिंग चव्हाण विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
खामगावात दोन ऑटो चालकांच्या वादात एकाचा मृत्यू
जिल्ह्यातील खामगाव शहरातील निर्मल चौकात प्रवाशी बसवण्यावरून दोन ऑटो चालकांमध्ये झालेल्या वादामुळे एका ऑटो चालकाची पोटात धारदार चाकू भोसकून हत्या केल्याची घटना 1 एप्रिलला घडली. मृत्यू झालेल्या ऑटो चालकाचे नाव अजय आवटे आहे. तसेच हत्या करणारा मेहरसिंग गोविंदसिंग चव्हाण याला पोलिसांनी अटक केले आहे.