ETV Bharat / state

मलकापुरात मांडूळ सापासह एकाला अटक, जुगार अड्ड्यावरून लाखोंचा मुद्देमाल जप्त - सापाची तस्करी

दाताळा शिवारामध्ये जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ आणि अप्पर पोलीस अधीक्षक, खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया ढाकणे यांच्या पथकाने हा छापा टाकला होता.

snake
मलकापुरात मांडूळ सापासह एकाला अटक
author img

By

Published : Jan 22, 2020, 5:10 PM IST

Updated : Jan 22, 2020, 5:28 PM IST

बुलडाणा - मलकापूर शहरालगत असलेल्या दाताळा शिवारामध्ये पोलिसांनी छापा टाकून दोन तोंडी मांडूळ जातीचा दुर्मीळ साप हस्तगत करण्यात आला. या कारवाईत विदेशी दारू, ९ मोटारसायकलींसह ३ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मांडूळ सापाची बाजारात जवळपास १ लाख किंमत आहे.

मलकापुरात मांडूळ सापासह एकाला अटक

हेही वाचा - तान्हाजी अखेर महाराष्ट्रात टॅक्स-फ्री

दाताळा शिवारामध्ये जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ आणि अप्पर पोलीस अधीक्षक, खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया ढाकणे यांच्या पथकाने हा छापा टाकला होता.

हेही वाचा - शिक्षक पात्रता परीक्षेमधील चुकांचे व्हायरल सत्य...

या प्रकरणातील मुख्य आरोपी दिपक रामदास थाटे (वय ३६, रा. मलकापुर) याला अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय अधिकारी प्रिया ढाकणे यांच्यासह ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी करीत आहेत.

Intro:Body:mh_bul_Arrest one with snaker_10047

Story : मलकापुरात मांडूळ सापा सह एकास अटक
लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

बुलडाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरालगत असलेल्या दाताळा शिवारामध्ये जुगार खेळला जात असल्याची मिळालेल्या गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यावरून मंगळवारी सायंकाळी पथकाने टाकलेल्या धाडीमध्ये एका आरोपीसह एक लाख रुपये किमतीचा दोन तोंडी मांडूळ जातीचा दुर्मीळ साप ( ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत करोडो रुपये मध्ये किंमत आहे),इंग्लिश दारू आणि नऊ मोटरसायकली सह एकूण 3 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
२१ जानेवारी रोजी रात्री मिळालेल्या गुप्त बातमीवरुन मलकापुर तालुक्यातील दाताळा येथे जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ व अप्पर पोलीस अधिक्षक खामगाव यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया ढाकणे यांनी आपल्या पथकासह टाकलेल्या धाडीत एका आरोपीसह दुर्मीळ जातीचा एक जिवंत मांडुळ दोन तोंडी साप किंमत अंदाज़े १ लाख , ५२ ताश पत्ते किंमत अंदाजे ३० रु , नगदी रोख रक्कम २५ ,३०० रु व मॅकडॉल नं . १ कंपनीचे १८० एम.एल चे ४ नग व इंपेरीयल ब्ल्यु कंपनीचे १८० एम . एल चे ०२ नग असे एकुण ०६ नग कि . १२०० रु विना परवाना दारू विक्री करीता बाळगतांना मिळून आले . जुगार खेळणाऱ्या इसमांनी घटनास्थळावरुन पळ काढला व त्यांच्या ९ मोटार सायकल घटनास्थळी निंबादेवी मंदीराचे अलीकडे असलेल्या शेतामध्ये आढळून आल्या . यातील मुख्य आरोपी दिपक रामदास थाटे वय ३६ रा मलकापुर यास सदर गुन्हयात अटक केली असुन इतर आरोपीतांचा शोध पोलीस घेत आहेत . या कार्यवाहीत एकुण ०३ लाख ७८ हजार ६४० रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदरची कार्यवाही उप विभागीय अधिकारी श्रीमती ढाकणे मॅडम सह सदर गुन्हयाचा तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी हे करीत आहेत .

बाईट. - श्रीमती प्रिया ढाकणे (उपविभागीय पोलीस अधिकारी)

- फहीम देशमुख मलकापूर (बुलडाणा)
-------------------------------------------------Conclusion:
Last Updated : Jan 22, 2020, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.