बुलडाणा - सेल्फी काढण्याच्या नादात एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना खामगाव येथे घडली.
खामगावमधील सुटाळा खुर्द येथील सावजी ले आऊटमधील पंधरा वर्षाचा हेमंत जांगीड बोर्डी नदीच्या सिमेंट बंधाऱ्यावर सेल्फी काढत होता. यावेळी तोल जाऊन तो नदी पात्रातील पुराच्या पाण्यात वाहून गेला.
सोबतच्या काही मित्रांनी आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत हेमंत वाहून गेला होता. संबंधित माहिती मिळताच महसूल कर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या गावकऱ्यांच्या मदतीने हेमंतचा शोध सुरू आहे.