बुलडाणा - चिखली रस्त्यावरील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या कार्यालयासमोर रविकांत तुपकर व त्यांचे स्वीय सहायक सौरभ पडघान यांच्यावर हल्ला झाल्याची घटना बुधवारी (दि. 9 डिसें.) सायंकाळी घडली. यामध्ये त्यांचे स्वीय साहायक सौरभ पडघान जखमी झाले आहे.
बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात पोलिसांनी घटनास्थळावून हल्लेखोर जनार्धन गाडेकर याला ताब्यात घेतले आहे. रविकांत तुपकर यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे.
हल्लेखोर त्यांच्याच गावातील व्यक्ती
रविकांत तुपकर आपल्या कार्यकर्त्यांसह चिखली रस्त्यावरील कार्यालयात बसले असताना त्यांच्याच सावळा गावातील जनार्धन गाडेकर या व्यक्तीने हातात कुर्हाड घेऊन तुपकर यांच्या कार्यालयावर हल्ला केला. यावेळी तुपकर यांच्यावर वार करण्यापूर्वी त्यांचे अंगरक्षक आणि स्वीय सहाय्यक मधे आल्याने तुपकर बचावले. पण, झटापटीत तुपकर यांच्या स्वीय सहायकाच्या छातीत जबर मार लागला आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तुपकर यांनी तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा - कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी लाच घेणारा उपकोषागार अधिकारी रंगेहात पकडला
हेही वाचा - बुलडाणा जिल्ह्यात भारत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद, ठिकठिकाणी राजकीय पक्ष, शेतकरी संघटना उतरल्या रस्त्यावर