ETV Bharat / state

बुलडाणातील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेत दीड कोटींचा घोटाळा, अध्यक्षांसहीत 4 कर्माचाऱ्यांवर गून्हा दाखल - महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था

चिखली येथील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेत दीड कोटींचा घोटाळा झाल्याची घटना समोर आली आहे. पतसंस्थेत पैसे अडकल्याने अनेक ठेवीदारांचे संसार रस्त्यावर आले आहेत. अध्यक्ष, कर्मचारी आणि बँकेचे इतरही संचालक मडंळ यात सामील असण्याची शक्यता आहे. या सर्वांवर कारवाई व्हावी आणि त्यांच्याजवळील संपत्ती जप्त करून आमचे पैसे परत करावे, अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे.

महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेत दीड कोटींचा घोटाळा
author img

By

Published : Jul 18, 2019, 5:12 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील चिखली येथील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेत दीड कोटींचा घोटाळा झाल्याची घटना समोर आली आहे. ठेवींची अफरातफर केल्याप्रकरणी या पतसंस्थेच्या अध्यक्ष , मुख्य शाखा व्यवस्थापक , रोखपाल , आणि शाखा व्यवस्थापक या ४ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. परंतू हे सर्वजण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेत दीड कोटींचा घोटाळा

बँकेवर राजकीय वरदहस्त ?

चिखली येथील राजकीय क्षेत्रात दबदबा असलेले, तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता खरात यांनी १२ वर्षांपूर्वी ११ संचालकांना सोबत घेऊन चिखली शहरात महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था सुरु केली होती. काही वर्षांतच ठेवीदारांचे पैसे असुरक्षित असल्याचे दिसून आले होते. मात्र राजकीय वजन असल्याने आणि संचालक मडंळी सुद्धा राजकारणाशी निगडित असल्याने पतसंस्था चालूच ठेवली गेली. या पतसंस्थेचा आता १२ वर्षांचा कालावधी उलटला आहे.

ठेवीदारांचा आक्रोश

मागील २ वर्षांपासूनच पतसंस्थेची आर्थिक स्थिती बिघडली होती. चिखली तालुक्यातील अनेक ठेवीदीरांच्या एकूण ६ कोटींहून अधिकच्या ठेवी या पतसंस्थेत आहेत. मुदत संपूनही पैसे मिळेनासे झाल्याने, ठेवीदार बँकेत चकरा मारत आहेत. पैसे बुडण्याच्या भितीने कित्येकांच्या अश्रूंचा बांध फूटलेला दिसत आहे. ठेवीदारांनी अध्यक्षांच्या घरी जाऊन भेट घेतली. सहाय्यक निबंधक, जिल्हा सहकारी निबंधक यांच्याकडेही चकरा मारल्या पण थकले पैसे मात्र काही परत मिळत नाहीत. या प्रकरणात कोणाचे १० लाख, कोणाचे १८ लाख तर अगदी २४ लाख रूपये देखील अडकले आहेत. कोणी मुलीच्या लग्नासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, नातवांसाठी पैसे ठेवलेले आहेत.

ठेवीदारांकडून योग्य कारवाई आणि न्यायाची मागणी

सहकार विभागाने या पतसंस्थेचे मागील २ वर्षाचे ऑडिट केले असता त्यात अनेक धक्कादायक बाबी आढळल्या. बँकेने कर्ज वाटप करताना कोणतेही तारण घेतलेले नाही, अध्यक्ष आणि संचालकांच्या जवळच्या लोकांच्या नावावर पैसे काढल्याचे दिसत आहे. कर्मचाऱ्यांनी सुद्धा परस्पर पैसे काढल्याचे दिसून आले. या बँकेत अनेक लोकांचे पैसे अडकले असून काही ठेवीदार अद्यापही समोर आलेले नाहीत. संपूर्ण ठेवीदार समोर आल्यास हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पोलिसांत तक्रार दिली गेल्यानंतर बँकेचे अध्यक्ष, मुख्य शाखा व्यवस्थापक, रोखपाल आणि शाखा व्यवस्थापक यांच्यावर अपहार केला म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले. परंतू हे सर्वजण फरार आहेत. त्यांच्या अटकेची प्रक्रिया चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान या घटनेनंतर अगोदरच्या काही घटना पाहता, महाराष्ट्रातील कुठल्याच पतसंस्थेतील ठेवी सुरक्षीत नसल्याची ओरड ठेवीदार करताना दिसत आहे.

administrator and functionary of bank
महात्मा फुले पतसंस्थेतील घोटाळा प्रकरणील ४ जनांविरोधात गुन्हे

Intro:Body:बुलडाणा:- चिखली येथील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेत दीड कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी या पतसंस्थेच्या अध्यक्ष , मुख्य शाखा व्यवस्थापक , रोखपाल , आणि शाखा व्यवस्थापक या ४ आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले असून आरोपी फरार होण्यात यशस्वी झालेय .. तर हा घोटाळा दीड कोटींचा नसून अजूनही चौकशीदरम्यान या घोटाळ्याचा आकडा वाढण्याची शक्यात वर्तवण्यात आलीय .. मात्र ठेवीदारांचे पैसे अद्यापही मिळत नसल्याने ठेवीदार चिंतेत सापडलेय यामुळे महाराष्ट्रातील कुठल्याच पतसंस्थेत ठेवी सुरक्षीत नसल्याची ओरड ठेवीदार करतांना दिसत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील राजकीय क्षेत्रात नावलौकिक असलेले तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी नगरसेवक दत्ता खरात यांनी १२ वर्षांपूर्वी ११ संचालकांना सोबत घेऊन चिखली शहरात महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था सुरु केलीय .. ठेवीदारांचे पैसे असुरक्षित च राहिलेय .. मात्र राजकीय वजन असल्याने आणि संचालक मडंळी सुद्धा राजकारणाशी निगडित असल्याने पतसंस्था चालूच ठेवली .. आता जवळपास या पतसंस्थेच्या १२ वर्षांचा कालावधी उलटला , मागील २ वर्षांपासून पतसंस्थेची आर्थिक स्थिती आणखीनच बिघडली .. चिखली तालुक्यातील अनेक लोकांच्या ६ कोटींच्या ठेवी असलेल्या ठेवीदारांचे पैसे मुदत संपूनही मिळनासे झालेय .. ठेवीदार बँकेत चकरा मारून थकले , अध्यक्षांच्या घरी सुद्धा जाऊन थकले , शिवाय सहाय्यक  निबंधक , जिल्हा सहकारी  निबंधक यांचण्याकडे हि चकरा मारून थकले मात्र पैसे काही मिळत नाहीत .. फक्त उडवाउडवीची उत्तरे मिळतात .. यात कोणाचे १० लाख रुपये अडकले , कोणाचे १८ लक्ष रुपये अडकले , २४ लक्ष अडकले , कोणाचे मुलीच्या लग्नाचे , मुलांच्या शिक्षणाचे , नातवाचे शिक्षणाचे , वृद्धांचे पैसे अडकले असून आता काय करायचे असा प्रश्न ठेवीदारांसमोर उभा राहिलाय .. 

पतसंस्थेत पायी पायी जमा करून ठेवलेले पैसे मिळत नसल्याने शेवटी ठेवीदारांनी जिल्हा सहकारी निबंधक यांच्याकडे तक्रारी केलाय .. त्यानुसार सहकार विभागाने या पतसंस्थेचे मागील २ वर्षाचे ऑडिट केले असता त्यात अनेक धक्कादायक बाबी आढळल्या .. बँकेने कर्ज वाटप करताना कोणतेही तारण घेतलेले नाही , अध्यक्ष आणि संचालकांच्या जवळच्या लोकांच्या नावावर पैसे काढल्याचे दिसतेय , कर्मचाऱ्यांनी सुद्धा पैसे परस्पर पैसे काढल्याचे दिसतते , शिवाय खर्च हि अवास्तव करण्यात आलाय .. असा  जवळपास मागील २ वर्षात  १ कोटी ४७ लाख २० हजार ३२९ रुपयांचा अपहार केल्याचे निषपन्न झालेय .. अशा अनेक लोकांचे पैसे या बँकेत अडकले असून काही ठेवीदार अद्यापही समोर आलेय नाहीय .. या बँकेचे संपूर्ण ठेवीदार समोर आल्यास हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीय .. ऑडिट मध्ये या सर्व बाबी समोर आल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दिलीय .. आणि बँकेचे अध्यक्ष - दत्ता खरात , मुख्य शाखा व्यवस्थापक -सतीश वाघ , रोखपाल - परमेश्वर पवार , आणि शाखा व्यवस्थापक - गणेश खंडागळे यांच्यावर दीड कोटींचा अपहार केला  म्हणून भांदवी कलम 420 , 409, 406, 468,470,471,477-अ, 34 तसेच महाराष्ट्रं ठेविदारांच्या ( वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण ) अधिनियम 1999 नुसार कलम ३ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून हे सर्व फरार आहेय  , त्यांची अटकेची प्रक्रिया चालू असल्याचे पोलिसांनी सांगितलेय .. 

बाईट -- गुलाबराव वाघ , ठाणेदार , चिखली पोलीस स्टेशन .. 

पतसंस्थेत पैसे अडकल्याने अनेक ठेवीदारांचे संसार रस्त्यावर आलेय असून अध्यक्ष सहित ३ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले खरे , मात्र बँकेत इतरही संचालक मडंळी असून ते सुद्धा या अफ़रातफ़रीला  तितकेच जबाबदार आहेत..  त्यांच्यावर हि कारवाई व्हायला हवी आणि त्यांच्याजवळील संपत्ती जप्त करून लोकांच्या पैसे परत द्यावे अशी मागणी ठेवीदारांनी केलीय .. 
एकंदरीत गुन्हे दाखल झालयावर महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या पैशाचे काय ? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झालाय .. तर जिल्ह्यातील इतरही बँकेत असलेल्या ठेवीदारांचे पैसे सुरक्षित आहेत असी ओरड ठेवीदार करत आहे .. 

बाईट:- ठेवीदार

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.