ETV Bharat / state

बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा पोहचला 118 वर; 5 नवीन कोरोना रुग्णांची भर

author img

By

Published : Jun 15, 2020, 10:21 AM IST

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅब नमुन्याच्या अहवालांपैकी 46 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 41 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 5 अहवाल पॉझिटिव्ह आले. या पाच रुग्णांपैकी मलकापूर येथील पारपेट भागातील 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान बुलडाणा येथे कोविड रुग्णालयात मृत्यू झाला.

बुलडाणा
बुलडाणा

बुलडाणा - जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रविवारी पुन्हा नवीन 5 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. या पाच रुग्णांपैकी मलकापूर येथील पारपेट भागातील 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान बुलडाणा येथे कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 5 झाली आहे. सदर व्यक्तीला 12 जून रोजी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅब नमुन्याच्या अहवालांपैकी 46 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 41 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 5 अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील 33 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय तरुण आणि 22 वर्षीय महिला, खामगाव तालुक्यातील चिखली 25 वर्षीय तरुण, पारपेट भागातील 65 वर्षीय वृद्ध (उपचारादरम्यान मृत्यू) यांचा समावेश आहे.

आतापर्यंत 1 हजार 750 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 118 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी 5 मृत आहे. तसेच 77 कोरोनाबधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रूग्णालयात 36 कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.