बुलढाणा : अंत्यसंस्काराच्या पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकत 4 बहिणींनी लाडक्या पित्याला साश्रू नयनांनी खांदा ( Four Sister Did Last Rights Of Father ) दिला. बुलडाणा तालुक्यातील भादोला गावात अंतिम निरोपाचा हा दु:खद प्रसंग गावकऱ्यांनी अनुभवला. ग्रामीण भागात शेतकरी सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून काम करणारे पुंजाजी तुकाराम खडेकर यांचे रविवारी आकस्मिक निधन ( Farmers Society Secretary ) झाले.
शेतकरी सोसायटीचे सेक्रेटरी : तालुक्यात ग्रामीण भागात शेतकरी सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून काम करणारे पुंजाजी तुकाराम खडेकर यांनी शेतकरी हित जोपासत 58 वर्ष सेवा दिली.विशेषता भादोला,डोंगर शेवली, केळवद,सावना येथे त्यांनी भरीव काम केले आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती खालावल्याने ते अस्वस्थ होते. अखेर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना मुलगा नसल्यामुळे त्यांच्या 4 मुलींनी त्यांना खांदा दिला. स्मशान भूमी त पार्थिवाला अग्नीही मुलींनीच ( New Step In Male Dominated Culture ) दिला. यावेळी गावकऱ्यांचे डोळे पाणाले होते.
पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा : पुंजाजी खडेकर गेल्या काही दिवसांपासून वयोमानापरत्वे आजारी होते. रविवारी त्यांचे निधन झाले. अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या आशा जाधव, उषा चव्हाण, वर्षा भोंडे,मनीषा भोसले या 4 मुलींनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला.पित्याला खांदा देऊन सर्व अंत्यसंस्कारही पार पाडले. पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत या 4 लाडक्या मुलींनी आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला.