बुलडाणा - बुलडाण्यात आज (गुरुवार) पुन्हा नव्याने 2 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 77 झाली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांच्या अहवालांपैकी 54 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 52 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 2 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सदर अहवाल मलकापूर येथील 40 वर्षीय पुरुष आणि धरणगांव ता. मलकापूर येथील 70 वर्षीय वृद्ध महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत 1 हजार 370 निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 77 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी तीन जणांता मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 47 कोरोनाबधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 47 आहे. तर, सध्या रुग्णालयात 27 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजरोजी 54 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 2 अहवाल पॉझिटिव्ह, तर 52 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. आजरोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 74 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1 हजार 370 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.