ETV Bharat / state

धक्कादायक! नगरपरिषद कर्मचाऱ्याला करावे लागते नगरसेविकेचे घरगडी म्हणून काम - बुलडाणा नगरपरिषद

राकेश बहुनिया हा खामगाव नगर परिषदेमध्ये सफाई कर्मचारी या पदावर काम करत असून तो राहत असलेल्या सतीफैल भागातील नगरसेविका लता गरड यांच्या घरात त्याला घरकाम करावे लागत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

municipal staff has to do the housework of corporaters house
धक्कादायक! नगरपरिषद कर्मचाऱ्याला करावे लागते नगरसेविकेच्या घरातील घरकाम; बुलडाण्यातील खामगाव नगर परिषदेतील प्रकार
author img

By

Published : Nov 29, 2019, 9:41 AM IST

Updated : Nov 29, 2019, 10:30 AM IST

बुलडाणा - नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला नगरसेविकेने आपल्या घरातील साफ सफाई आणि कपडे धुवायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा कर्मचारी खामगाव नगर परिषदेमध्ये सफाई कर्मचारी या पदावर कार्यरत असून त्याचे नाव राकेश बहुनिया असून तो सतीफैल भागातील रहिवासी आहे. सतीफैल भागातील भाजप नगरसेविका लता गरड यांच्या घरात हा कर्मचारी कपडे धुत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने या सफाई कर्मचाऱ्याचा शोध घेऊन हे प्रकरण उघड केले आहे.

धक्कादायक! नगरपरिषद कर्मचाऱ्याला करावे लागते नगरसेविकेच्या घरातील घरकाम; बुलडाण्यातील खामगाव नगर परिषदेतील प्रकार

हेही वाचा - शेतकऱ्यांना कर्जमाफी, १० रुपयात मिळणार पोटभर जेवण; नव्या सरकारचा किमान समान कार्यक्रम घोषित

राकेश बहुनिया हा खामगाव नगर परिषदेमध्ये सफाई कर्मचारी या पदावर काम करत असून तो राहत असलेल्या सतीफैल भागातील नगरसेविका लता गरड यांच्या घरात त्याला घरकाम करावे लागत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कर्मचाऱ्याशी याबाबत विचारले असता त्याने सांगितले की, पालिकेतील आरोग्य विभातील शिपाई संजय तांबोले हा त्याला हे काम करण्यास सांगायचा आणि काम केले नाही तर गैरहजेरी लावून कामावरून निलंबित करण्याची धमकी द्यायचा. राकेश काम करत असलेल्या सतीफैल भागाच्या नगरसेविका लता गरड यांच्या घरचे साफ सफाई आणि घरकाम करण्याचे काम तांबोले हा राकेश याला सांगत होता. यासंदर्भात तांबोलेवर कारवाई करण्याची मागणी या कर्मचाऱ्याने केली आहे.

हेही वाचा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचा चेहरा

यासंदर्भात पालिकेच्या मुख्याधिकारी धनंजय बोरिकर यांना याबाबत विचारले असता त्यांनी माझ्यापर्यंत हा व्हिडिओ आला असून लेखी तक्रार आल्यावर आपण यावर कारवाई करू, असे म्हटले आहे. याप्रकरणी गरड यांच्या मुलाने आमच्याकडे कोणीही सफाई कर्मचारी काम करत नसून हा आम्हाला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे म्हटले आहे. नगर परिषद १९६५ च्या कायद्यानुसार नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय अधिकारी किंवा राजकीय पदाधिकारी यांच्या घरी घरकाम करण्यासाठी वापरले गेले, तर संबंधितावर कारवाई करण्याची तरतूद आहे. आता या प्रकरणात संबंधित दोषींवर काय कारवाई होते, हे पहावे लागेल.

Intro:Body:बुलडाणा:- ज्या भागात साफ-सफाईची करायची आहे त्या भागात साफ-सफाई करू न देता चक्क त्याच भागाच्या नगरसेविका तथा पाणी पुरवठा सभापतींच्या घरातले कपडे धुणेचे काम करायला लावत असल्याची पोष्ट सह कपडे धुत असल्याचा व्हिडीओ तयार करून ज्याच्या त्रासामुळे कपडे धुत आहे आणि ज्याच्या घरातील कपडे धुत आहे ही माहिती पोष्ठ सह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची आप-बिती कथन करण्याचा प्रयत्न केल्याने बुलडाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.यावर हा सफाई कामगार कोणत्या ठिकाणचा असून त्याला शोधून त्यांच्यावरील होत असलेल्या अन्यायाची माहिती घेण्याचा प्रयत्न इटीव्ही भारतने केला. सदर सफाई-कामगार हा खांमगाव नगर परिषदेतील सफाई कामगार असून तो मेहत्तर समाजाचा आहे.त्याची साफ-सफाई करण्याची जबाबदारी सतीफैल भागात असून याच सतीफैल भागातील भाजपच्या नगरसेविका तथा पाणीपुरवठा सभापती लता गरड यांच्या घरातील कपडे धुण्याचा काम आरोग्य विभातील शिपाई संजय तांबोले करायला लावायचा आणि नकार दिला तर गैरहाजरी लावून पगार कापिन,निलंबित करायला लावू अश्या धमक्या दिल्यामूळे वरील कपडे धुण्याचे काम करणे पडते असा आरोप करीत पोष्ठसह व्हिडीओ व्हायरल केल्याचे सफाई कामगार याने इटीव्ही भारतच्या प्रतिनिधी कडे कथन करून आरोग्य विभागातील शिपाई संजय तंबोले यांच्यावर कारवाई करुन त्या ठिकाणाहून बदली करण्याची मागणी केले आहे.तर या प्रकरणी मुख्यधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.सदर सफाई-कामगाराचे नाव राकेश बहुनिया असून तो स्वतः सती-फैल भागात राहणारा आहे.सदर प्रकारणात खांमगाव नगर परिषदेचे मुख्यधिकारी धनंजय बोरिकर यांनी व्हिडीओ माझ्या पर्यन्त आलेले आहे.मात्र व्हायरल केलेल्या व्हिडीओ मध्ये कोणत्याही नगरसेवक-नगरसेविकांचे उल्लेख नसल्याने लेखी तक्रार आल्यावर चौकशी करुन कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.विशेष म्हणजे सफाई-कामगार राकेश यांनी पोष्ठ सह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यावरही मुख्याधिकारी धनंजय बोरीकर केवळ व्हिडीओ त्यांच्या पर्यन्त आल्याचा सांगत असल्याने 'दाल में काही काला हैं' चा प्रत्यय येत आहे.तर सफाई कामगार राकेशने पोष्ठमध्ये ज्या नगरसेविका तथा पाणीपुरवठा सभापती गरड यांच्या घरातील कपडे धुतल्याचे सांगितले आहे त्या नगरसेविकांचे चिरंजीव पवन गरड यांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओ आमच्या घरातील नसून आमच्याकडे कोणताही सफाई-कामगार आमचा वैयक्तिक काम करीत नसून आम्हाला बदनाम करण्याचा षडयंत्र विरोधी राजकारणी करीत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.विशेष म्हणजे नगर परिषद 1965 च्या कायद्यानुसार नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय अधिकारी तथा राजकीय पदाधिकारी यांच्या घरी घरकाम करण्यासाठी वापरले गेले तर संबंधितावर कारवाई करण्याची तरतूद आहे..

"भाऊ सतीफैल का नगरसेवक हे वो ऊसका नाम पवन गरड और चपराशी का नाम सजंय तंबोले है सफाईगार का नाम राकेश बहुनिया हे कपडे नही धुये तो पगार काटता ऐसा पीडीत का आरोप है उसका यह नंबर हैं" अशी आप-बितीची एक पोष्ठ सह एक इसम कपडे धुत असल्याचा व्हिडीओ सध्या बुलडाणा जिल्ह्याच्या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहे.हा इसम कोण आहे आणि जिल्ह्यातील कोणत्या नगर परिषदेचा हा सफाई-कामगार आहे.त्याच्यावर कोणता नगर सेवक हा अन्याय करतो हे शोधण्याचा इटीव्ही भारतचे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी वसीम शेख यांनी प्रयत्न केला सदर सफाई-कामगाराला संपर्क केला असता तो बुलडाणा जिल्ह्यातील खांमगाव नगर परिषदेचा मेहत्तर समाजाचा सफाई-कामगार असल्याचा समोर आला.त्याचे राकेश बहुनिया असे नाव आहे.राकेशला प्रत्यक्ष भेटले असता त्याने इटीव्ही भारत कडे आप-बिती कथन केली की, तो गेल्या 7 वर्षांपासून खांमगाव नगर परिषदेत सफाई-कामगार पदावर कार्यरत आहे.त्याची सतीफैल भागात साफ-सफाईची जबाबदारी असून तो त्याच भागत राहणारा आहे.या भागात साफ-सफाईचा काम न करू देता आरोग्य विभागाचे संजय तंबोले नामक शिपाई त्याला त्रास देत सतीफैल भागातील भाजपच्या नगरसेविका तथा पाणीपुरवठा सभापती लता गरड यांच्या घरातील कपडे धुण्याचा काम करायला लावतो व ते करण्यास नकार दिला असता पगार कापू नाहीतर निलंबित करायला लावू अशी धमक्या देतो यालाच कंटाळून एक पोष्ठसह एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे सांगितले.तर सदर प्रकारणात खांमगाव नगर परिषदेचे मुख्यधिकारी धनंजय बोरिकर यांनी व्हिडीओ माझ्या पर्यन्त आलेले आहे.मात्र व्हायरल केलेल्या व्हिडीओ मध्ये कोणत्याही नगरसेवक-नगरसेविकांचे उल्लेख नसल्याने लेखी तक्रार आल्यावर चौकशी करुन कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.विशेष म्हणजे सफाई-कामगार राकेश यांनी पोष्ठ सह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यावरही मुख्याधिकारी धनंजय बोरीकर केवळ व्हिडीओ त्यांच्या पर्यन्त आल्याचा सांगत असल्याने 'दाल में काही काला हैं' चा प्रत्यय येत आहे.तर सफाई कामगार राकेशने पोष्ठमध्ये ज्या नगरसेविका तथा पाणीपुरवठा सभापती गरड यांच्या घरातील कपडे धुतल्याचे सांगितले आहे त्या नगरसेविकांचे चिरंजीव पवन गरड यांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओ आमच्या घरातील नसून आमच्याकडे कोणताही सफाई-कामगार आमचा वैयक्तिक काम करीत नसून आम्हाला बदनाम करण्याचा षडयंत्र विरोधी राजकारणी करीत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.विशेष म्हणजे नगर परिषद 1965 च्या कायद्यानुसार नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय अधिकारी तथा राजकीय पदाधिकारी यांच्या घरी घरकाम करण्यासाठी वापरले गेले तर संबंधितावर कारवाई करण्याची तरतूद आहे. वसीम शेख इटीव्ही भारत बुलडाणा..

बाईट:- 1)राकेश बहुनिया,तक्रार कर्ता( फिका गुलाबी शर्ट)

2) धनंजय बोरीकर,मुख्यधिकारी खांमगाव नगर परिषद ( निळसर चॉकडी शर्ट)

3) पवन गरड,चिरंजीव भाजप नगरसेविका तथा पाणीपुरवठा सभापती लता गरड ...( मेहंदी कलर शर्ट)

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : Nov 29, 2019, 10:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.