ETV Bharat / state

बुलडाणा : मुकुल वासनिक यांच्या सभेत राडा होण्याची शक्यता - Mukul Wasnik Meeting in Jamod

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अनेक नेतेमंडळी इच्छुक होते. तर यावेळेस भारिप बहुजन महासंघामधून काँग्रेसमध्ये घरवापसी करणाऱ्या सहकार क्षेत्रातील नेते प्रसेनजीत पाटील यांच्यासह डॉ. स्वाती वाकेकर, प्रकाश पाटील, रमेश घोलप आदींनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. अशा वेळेस प्रसेनजीत पाटील आणि स्वाती वाकेकर यांच्यापैकी एकाला तिकीट मिळणार यावर शिक्कामोर्तब झाला होता. मात्र, शेवटच्या क्षणी डॉ. वाकेकर यांनी उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पाटील यांचे कार्यकर्ते नाराज आहेत.

मुकुल वासनिक
author img

By

Published : Oct 16, 2019, 12:40 PM IST

Updated : Oct 16, 2019, 12:50 PM IST

बुलडाणा - जळगाव-जामोद विधानसभा मतदारसंघातील प्रसेनजित पाटील यांच्या समर्थकांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांविरुद्ध बंड पुकारले आहे. प्रसेनजित पाटील यांना उमेदवारी नाकारून डॉ. स्वाती वाकेकर यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्यामुळे 17 ऑक्टॉबरला काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांची सभा पाटील समर्थक सभा उधळून लावण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

जिल्ह्यातील जळगाव-जामोद विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अनेक नेतेमंडळी इच्छुक होती. तर यावेळेस भारिप बहुजन महासंघामधून काँग्रेसमध्ये घरवापसी करणाऱ्या सहकार क्षेत्रातील नेते प्रसेनजीत पाटील यांच्यासह डॉ. स्वाती वाकेकर, प्रकाश पाटील, रमेश घोलप आदींनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. अशा वेळेस प्रसेनजीत पाटील आणि स्वाती वाकेकर यांच्यापैकी एकाला तिकीट मिळणार यावर शिक्कामोर्तब झाला होता. मात्र, शेवटच्या क्षणी डॉ. वाकेकर यांनी उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पाटील यांचे कार्यकर्ते नाराज आहेत.

हेही वाचा - विकासकामांचे फक्त फलकच... अलमपूर गाव अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत

मंगळवारी सायंकाळी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा या गावामध्ये वाकेकर यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांसह परिसरातील नेते व कार्यकर्ते मंडळी उपस्थित होते. यावेळी बैठक सुरू असतानाच काही कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांना प्रसेनजित पाटील यांच्या कापलेल्या उमेदवारी प्रश्न केले. यावेळी अंभोरे यांनी कार्यकर्त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते आणखी भडकले.

त्यामुळे हे प्रकरण ताजे असतानाच काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक गुरुवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये जळगाव जामोद आणि खामगाव विधानसभा मतदारसंघात ते प्रचार सभेला मार्गदर्शन करणार आहेत. मात्र, जळगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षश्रेष्ठींनी विशेषता मुकुल वासनिक यांनी विजय अंभोरे यांच्यामार्फत पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तसा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय पाटील समर्थकांनी फेसबुक, व्हाट्सअपवरही याबाबतचे आरोप केले आहेत. त्यामुळे या सभेत राडा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - 'त्या' शेतकऱ्याची आत्महत्या गृहकलहातून, पोलीस तपासात निष्पन्न

दरम्यान, वासनिक जळगाव-जामोद विधानसभा मतदारसंघाचा दौरा रद्द करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, असे न झाल्यास वासनिक यांच्याविरुद्ध प्रचंड नारेबाजी किंवा त्यांना कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

Intro:Body:
Story मुकुल वसनिकांच्या सभेत राडा होण्याची शक्यता
काळे झेंडे दाखवण्याची कार्यकर्त्यांची तयारी
प्रसेन्नजीत पाटील यांना तिकीट नाकारल्याने कार्यकर्ते संतप्त

बुलडाणा : : बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातून प्रसेन्नजीत पाटील यांना उम्मेदवारी नाकारून डॉ. स्वाती वाकेकर यांना उमेदवारी दिल्याने संतप्त झालेल्यापाटील समर्थकांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांविरुद्ध बंड पुकारून गावा-गावातून हाकलून लावण्याचे प्रकार समोर येत आहे. यामध्ये उद्या १७ ऑक्टॉबर रोजी याच मतदार संघात पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक हे दौऱ्यावर येत आहे. आणि वासनिकांवरच पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप असल्याने त्यांची सभा उधळून लावण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले असलयाचे दिसून येत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात सध्या काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत कलह उफाळून आलेला आहे. आपल्या नेत्याला तिकीट मिळाले नाही म्हणून प्रसन्नजीत पाटील यांचे कार्यकर्ते पक्षश्रेष्ठीवर खूपच नाराज दिसत आहेत. काल मंगळवारी सोनाळा येथील एका कॉर्नर बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्ष हाकलून लावले याशिवाय शिवीगाळही केली. हे प्रकरण ताजे असतानाच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक हे उद्या गुरुवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये जळगाव जामोद आणि खामगाव विधानसभा मतदारसंघात ते प्रचार सभेला मार्गदर्शन करणार आहेत. मात्र जळगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षश्रेष्ठींनी विशेषता मुकुल वासनिक यांनी विजय अंभोरे यांच्यामार्फत पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. तसा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय पाटील समर्थकांनी फेसबुक व्हाट्सअप वरही याबाबतचे आरोप उघड उघड केले असल्याने आणि वाचकांच्या सभेकडे बोट दाखवीत "बघून घेऊ" अशा पोस्ट टाकत असल्याने वासनिक यांचा दौरा हा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात "राडा" उभा करणारा ठरणार असल्याचे दिसून येते. प्रसेनजित पाटील यांच्या समर्थकांनी मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ऐन वेळेवर पाटील यांची उमेदवारी पैसे घेऊन कापण्याचा आरोप कार्यकर्ते करीत आहे.. शिवाय पाटील यांनीही ही आपल्याला काँग्रेसमध्ये प्रवेश घेताना पक्षश्रेष्ठींनी म्हणजेच मुकुल वासनिक यांनी तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते फिरवले असल्याचे प्रसिद्धीमाध्यमांनी जवळ जाहीर केले होते. यामुळे कार्यकर्ते सध्या मुकुल वासनिक आणि त्यांचे समर्थक विजय अंभोरे यांना टार्गेट करीत असल्याचे दिसून येते. मंगळवारी सोनाळा या गावात अंभोरे यांना अश्लील शिवीगाळ करण्यात आली तसा व्हिडिओ ही व्हायरल झालेला आहे. मात्र यानंतर कालपासूनच सोशल मीडियावर वासनिक यांच्या दौऱ्याबाबत कार्यकर्त्यांना व पाटील समर्थकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहे. पक्ष निरीक्षक विजय अंभोरे तो सिर्फ झाकी है.... अभी........बाकी है 'अशी ही पोस्ट फेसबुक वर व्हायरल केल्या जात असल्याने असल्याने वासनिक बहुतेक जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचा दौरा रद्द करणार असल्याचेही ही माहिती प्राप्त झाली आहे. मात्र असे न झाल्यास वासनिक यांच्याविरुद्ध प्रचंड नारेबाजी किंवा त्यांना काळे झेंडे दाखवण्यात संकेत प्राप्त झाले आहे.

mh_bul_Workers prepare to display black flags_10047

टीप - पाटील समर्थकांनी फेसबुक वर केलेले यासंदर्भातील पोस्टचे स्क्रींशोट आणि मुकुल वासनिक यांचा फोटो सोबत पाठवीत आहे

Attach Vidio File - 00
Attach Foto File - 00
Attach Audio File - 00
-----------------------------------------------

- फहिम देशमुख, शेगाव (बुलडाणा)
मोबा- 09922014466Conclusion:
Last Updated : Oct 16, 2019, 12:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.