ETV Bharat / state

MP Amol Kolhe : शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकावा याकरता भगवा जाणीव आंदोलन छेडणार - खासदार डॉ.अमोल कोल्हे. - मुख्यमंत्री

शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकावा याकरता भगवा जाणीव आंदोलन छेडणार असल्याची घोषणा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. सदर बाब आपण अधिवेशनापूर्वी होणाऱ्या सर्व पक्षीय खासदारांच्या बैठकीत देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केल्याची माहिती कोल्हे यांनी दिली आहे. ते आज बुलडाण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Feb 18, 2023, 4:13 PM IST

Updated : Feb 18, 2023, 10:02 PM IST

शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकावा - खासदार डॉ.अमोल कोल्हे

बुलडाणा : छत्रपती शिवराय यांच्या शिवनेरीवर किल्लायावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा याकरता 2021 पासून सरकार दरबारी, पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करत आहे. तरीदेखील संपूर्ण शिवभक्तांची मागणी दुर्लक्षित असल्यामुळे आता त्याकरिता भगवा ध्वज जाणीव आंदोलन छेडणार असल्याचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी पत्रकारांची वार्तालाप करताना सांगितले. आज ते बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना पत्रकारांची संवाद साधला .

भगवा जागृती चळवळ : शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीला कायमस्वरूपी भगवा फडकवावा, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. बुलढाण्यात आल्यावर त्यांनी ‘भगवा जागृती चळवळ’ सुरू करण्याची भूमिका मांडली आहे. खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सरकारी शिवजन्मोत्सवावर बहिष्कार टाकणार असल्याची घोषणा बुलढाण्यात केली. वारंवार मागणी करुन देखील सरकार मागणीकडे लक्ष देत नसल्याने अमोल कोल्हे आक्रमक पहायला मिळता आहेत.

मोदी सरकाने दखल घेतली नाही : यावर प्रसारमाध्यमांनी प्रश्न उपस्थित करताच डॉ.अमोल कोल्हे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे आराध्य दैवत आहेत. शिवनेरीवर भगवा फडकवण्याची शिवभक्तांची मागणी. हे केवळ PSI च्या एका नियमामुळे होत नाही. त्यामुळे याबाबत मी केंद्रीय मंत्र्यांना वारंवार विचारणा केली आहे. संसदेच्या अधिवेशनातही ही मागणी फेटाळण्यात आली. मात्र, सरकारने कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत याबाबत चर्चा केली. दरम्यान, या शिवजयंतीनिमित्त भगवा जागृती आंदोलनाची त्यांनी भूमिका जाहिर केली आहे. बुलडाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार कोल्हे म्हणाले की, सरकारने याची जाणीव ठेवून शिवनेरी गडावर भगवा पडकावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा - Prakash Ambedkar On EC : पक्षांतर्गत वादावर निवाडा करण्याचा अधिकार आयोगाला आहे का? - प्रकाश आंबेडकर

Last Updated : Feb 18, 2023, 10:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.