ETV Bharat / state

मायलेकाने धारदार शस्त्राने केली वडिलांची हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सततच्या भांडणाला कंटाळून माय लेकाने धारदार शस्त्राने वार करून 45 वर्षीय वडिलाचा खून केला आहे. ही धक्कादायक घटना बोराखेडी पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या नांदुरा तालुक्यातील गोशिंग येथे घडली.

crime
खून
author img

By

Published : Dec 7, 2020, 8:46 PM IST

बुलडाणा - सततच्या भांडणाला कंटाळून माय लेकाने धारदार शस्त्राने वार करून 45 वर्षीय वडिलाचा खून केला आहे. ही धक्कादायक घटना बोराखेडी पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या नांदुरा तालुक्यातील गोशिंग येथे रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मायलेकास अटक केली आहे.

दारूच्या व्यसनामुळे दररोज उडत होते परिवारासोबत खटके -

बाबाजान नाना शेगर याने बोराखेडी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, गावातीलच त्याचा भाऊ जगन नाना शेगर यास दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याचे परिवारासोबत नेहमी खटके उडत होते. मागील दोन महिन्यापासून जगन शेगर हा जास्तच दारूच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याचे दररोज पत्नी वमुलासोबत भांडण होत होते. दरम्यान, रविवारी ६ डिसेंबरच्या रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जगन हा जास्त दारू पिऊन घरी आला. यावेळी त्याचे मुलगा व पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. यावेळी त्याचा मुलगा राजेंद्र जगन शेगर याने त्याची आई मंदाबाई जगन शेगर यांच्या मदतीने वडील जगन शेगर यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले. घाव वर्मी लागल्याने व रक्तस्त्राव जास्त झाल्याने जगन शेगर यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आज (सोमवार) या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, बोराखेडी ठाणेदार माधवराव गरुड यांच्यासह बोराखेडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल जंजाळ यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे गोशिंग गावात एकच खळबळ उडाली आहे.

मायलेकराला अटक

याप्रकरणी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी राजेंद्र जगन शेगर व मंदाबाई जगन शेगर या मायलेकाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून, त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते व ठाणेदार माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल जंजाळ व पोलीस मंगेश पाटील हे करत आहेत.

हेही वाचा - अदानी, अंबानींचे नुकसान भरून काढण्यासाठीच नव्या कृषी कायद्याची निर्मिती - राजू शेट्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.