ETV Bharat / state

बुलडाण्याच्या दुसरबीडमध्ये दोन चिमुकल्यांसह विवाहितेचा विहिरीत आढळला मृतदेह - latest buldhana news

आज सकाळी साडे सहाच्या सुमारास दुसरबीड गावानजीक मेहकर मार्गाला लागून असलेल्या सार्वजनिक विहिरीत तिघांचेही मृतदेह पाण्यावर तंरगताना आढळून आले.

बुलडाणा
बुलडाणा
author img

By

Published : May 19, 2020, 9:18 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथे दोन चिमुकल्यांसह एका विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याची हृदयद्रावक घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह आत्महत्या का केली, याचा तपास पोलीस करत आहेत.

सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील स्वाती अमोल जगदाळे (वय २८) ही विवाहिता १७ मे रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास ११ वर्षीय मुलगा गणेश व ९ वर्षीय मुलगी मयुरी यांना शौचास नेते म्हणून घरातून बाहेर पडली होती. परंतु, बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. त्यामुळे नातेवाईकांसह ग्रामस्थांनी रात्रभर तसेच काल सोमवारी दिवसभर तिघांचाही प्रत्यक्ष तसेच संपर्काद्वारे शोध घेतला. परंतु, त्यांचा कुठेच शोध लागला नाही. दरम्यान, आज सकाळी साडे सहाच्या सुमारास दुसरबीड गावानजीक मेहकर मार्गाला लागून असलेल्या सार्वजनिक विहिरीत तिघांचेही मृतदेह पाण्यावर तंरगताना आढळून आले.

या घटनेची माहिती मिळताच असंख्य ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली होती. परंतु, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच किनगावराजा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने या माय-लेकांचे मृतदेह विहिरीबाहेर काढून ते शवविच्छेदन करण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी मृत महिलेचा पती अमोल भगवान जगदाळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास किनगावराजा पोलीस करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.