ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींचे भाषण सुरू असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे... - MNS black flag between Rahul Gandhi Speech

सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली याचे कागद पत्र राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी पत्रकार परिषदेत दाखवले होते. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर राज्यात बरीच टिका झाली. शिवसेना भाजप यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्यावर टीका केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील राहुल गांधी यांना भाषणात ( Rahul Gandhi Speech ) काळे झेंडे दाखवले.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 18, 2022, 10:28 PM IST

बुलढाणा : भारत जोडो यात्रेमध्ये बिरसा मुंडा जयंती निमित्ताने भाषण करतांना सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. या वक्तव्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राहुल गांधी यांच्या भाषणात काळे झेंडे दाखवत निषेध केला.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

राहुल गांधी यांच्या भाषणात काळे झेंडे - सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली याचे कागद पत्र राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दाखवले होते. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर राज्यात बरीच टिका झाली. शिवसेना भाजप यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्यावर टीका केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील राहुल गांधी यांना भर भाषणात काळे झेंडे दाखवले.

गजानन महाराजांचे घेतले दर्शन - भारत जोडो यात्रेदरम्यान ( Bharat Jodo Yatra ) आज कॉंग्रेस खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी शेगाव येथील संत गजानन महाराज ( Sant Gajanan Maharaj ) यांचे दर्शन घेतले. संत गजानन महाराज की जय या घोषणेने राहुल गांधी यांनी भाषणाला सुरवात केली. यावेळी ते म्हणाले की विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की यात्रेचा फायदा काय. त्यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे लोकांच्या मनातून भीती काढून टाकणे आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे. ज्यातून समाजमनामध्ये पडलेली फूट मिटून जाईल आणि भारत जोडला जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.