ETV Bharat / state

लोकांची दिशाभूल करण्यासाठी राज्यात ईडी, आयकर विभागाकडून कारवाई - आमदार गायकवाड - MLA sanjay gaikwad

लखीमपूर दुर्घटनेपासून लोकांची दिशाभूल करण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्यात ईडी, आयकर व एनसीबीमार्फत कारवाई केली जात आहे, असा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.

न
author img

By

Published : Oct 10, 2021, 5:45 PM IST

Updated : Oct 10, 2021, 7:15 PM IST

बुलडाणा - लखीमपूर दुर्घटनेपासून लोकांची दिशाभूल करण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्यात ईडी, आयकर व एनसीबीमार्फत कारवाई केली जात आहे, असा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. लखीमपूर येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकला. शेतकरी या दबावाला न जुमानता आंदोलन सुरुच ठेवले. त्यानंतर त्यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घातले. यात आठ शेतकऱ्यांचा बळी गेला. या घटनेपासून देशातील नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच केंद्राकडून विविध संस्थांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय केंद्र सरकार घेत नाही.

बोलताना संजय गायकवाड

केंद्रात हत्यारे सरकार

लोकांची दिशाभूल करुन लखीमपूर येथील प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. पण, अमली पदार्थापेक्षा त्या आठ शेतकऱ्यांचा जीव महत्त्वाचा नाही का, असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकार हत्यारे सरकार आहे, असा अशी टाकाही यावेळी आमदार गायकवाड यांनी केली आहे.

महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक

उत्तरप्रदेशच्या लखमीपूर येथील घटनेच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदचे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा - बुलडाणा : कंपनीतील केमिकलयुक्त पाणी शेतात आल्याने मलाकापुरातील शेतकरी त्रस्त

Last Updated : Oct 10, 2021, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.