ETV Bharat / state

मातंग समाजातर्फे रामदास आठवले यांचा जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गीताचे विडंबन केल्याबद्दल बुलडाण्यामध्ये रामदास आठवले यांच्या प्रतिमेला जाळून त्यांचा निषेध व्यक्त केला. तर, जिल्ह्यातील मोताळा व मलकापूर येथेही रामदास आठवले यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले.

matang community protested against ramdas athavle in buldana
author img

By

Published : Aug 6, 2019, 8:01 AM IST

Updated : Aug 6, 2019, 8:19 AM IST

बुलडाणा - नेहमी आपल्या कविता ऐकवून, स्वतःला चर्चेत ठेवणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी, संयुक्त महाराष्ट्राच्या नवनिर्मितीमध्ये आपले मोलाचे योगदान देणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गीताचे विडंबन केले होते. तर, पत्रकारांशी बोलताना मध्येच बँड वाजवला म्हणून वाजंत्रीना शिवीगाळ केली होती. या घटनांचा बुलडाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध व्यक्त करत, बुलडाणा तालुक्यातील कोलवड या गावात आठवले यांच्या प्रतिमेला चपलांचे हार घालून जाळण्यात आले.

मातंग समाजातर्फे रामदास आठवले यांचा जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध

कोलवड येथे अॅड. प्रकाश गायकवाड, संजय तोताराम गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडोंच्या संख्येने मातंग समाजातील बांधव सहभागी होते. या आंदोलनात आठवलेंच्या प्रतिमेला भर रस्त्यात चपलांचा हार घालण्यात आला. तसेच, त्यांची प्रतिमा समाजाच्या वतीने जाळण्यात आली. तर दुसरीकडे मलकापूर, मोताळा येथे तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारकडे निवेदन सादर करून आठवलेंवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

Intro:Body:बुलडाणा: नेहमी हिणकस स्वरूपाच्या कविता ऐकवून स्वतःला चर्चेत ठेवणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चक्क संयुक्त महाराष्ट्राच्या नवनिर्मितीमध्ये आपले मोलाचे योगदान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गीताचे विडंबन केले. तर पत्रकारांशी बोलताना मध्येच बँड वाजवला म्हणून वाजंत्रीना शिविगाळ करत रामदास आठवले यांनी आपली पातळी सोडल्याचे समोर आले आहे.या घटनेचा बुलडाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध व्यक्त करून बुलडाणा तालुक्यातील कोलवड या गावात ना. आठवले यांच्या प्रतिमेला चपलांचे हार घालून जाळण्यात आले.तर जिल्ह्यातील मोताळा व मलकापूर येथे ही केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांना मंत्रीपदावरून कमी करण्याची कारवाईची मागणी केंद्र सरकारकड़े निवेदनद्वारे करण्यात आली.

सामाजिक न्याय केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या आक्षेपार्ह विधानाबद्दल त्यांची मंत्रीपदावरून कमी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे मागणी बुलडाणा जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. कोलवड येथे अॅड. प्रकाश गायकवाड, संजय तोताराम गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये सदर आंदोलन करण्यात आले असून यावेळी शेकडोच्या संख्येने मातंग समाज बांधव आंदोलनामध्ये सहभागी होते.या आंदोलनात भर रस्त्यावर चपलांचा हार घालण्यात आला व तसेच त्यांची प्रतिमा समाजाच्या वतीने जाळण्यात आली. तर दुसरीकडे मलकापूर, मोताळा येथे तहसीलदार मार्फत केंद्र सरकार कड़े निवेदनद्वारे सादर करून कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.

बाईट:- 1)एड,प्रकाश गायकवाड-कोलवड
2) सोपान पानपाटील-मोताळा

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : Aug 6, 2019, 8:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.