ETV Bharat / state

BSNL Godown Fire : खामगावमधील बीएसएनएल कार्यालय परिसरात भीषण आग - खामगावमधील बीएसएनएल कार्यालय परिसरात भीषण आग

खामगाव शहरानजीक असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड या कार्यालय परिसरात लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे. ही आग आज सकाळी लागली. या आगीमध्ये कार्यालय परिसरातील गोदमातील साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.

BSNL Godown Fire
बीएसएनएल कार्यालय परिसरात भीषण आग
author img

By

Published : Mar 19, 2022, 12:49 PM IST

Updated : Mar 19, 2022, 1:49 PM IST

बुलढाणा - खामगाव शहरानजीक असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड या कार्यालय परिसरात लागलेल्या आगीने ( BSNL Godown Fire ) रौद्ररूप धारण केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे. ही आग आज सकाळी लागली. या आगीमध्ये कार्यालय परिसरातील गोदमातील साहित्य जळून खाक ( Massive fire at BSNL godown) झाले आहे. या आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी लागली कशामुळे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. या आगीमध्ये बहुतांश प्रमाणात बाहेरील सुकलेले गाजर गवत जळून खाक झाले.

बीएसएनएल कार्यालय परिसरात भीषण आग

अग्नीशामक दल घटनास्थळी दाखल -

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एमआयडीसी भागात भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीमध्ये आग लागली. या कंपनीमध्ये कंपनीचे केबल आहे. या कंपनीमध्ये फक्त बीएसएनएलचे गोडावून असल्याचे समजते. यामध्ये ही कंपनी जास्त वापरात नसल्याने तिथे मोठे मोठे झाड आहे. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले आहे. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. मात्र, आग अद्यापही आटोक्यात आली नसल्याचे समजते. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या आगीत सर्वात जास्त प्रमाणात सुकलेले गाजर गवत जळून खाक झाले आहे. त्यामुळे या आगीला रौद्र रूप प्राप्त झाले आहे. त्यासोबत तिथे पडलेले केबल्स ही जळाल्याने आकाशात काळा धूर निघत होता.

BSNL Godown Fire
गोदामाला भीषण आग

घटनास्थळी अधिकारी, पोलीस दाखल -

आगीमध्ये गोदमातील केबल्स जळून खाक झाले आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे 5 ते 8 बंब प्रयत्न करत होते. घटनास्थळी खामगाव पोलीस दाखल झाले होते. बीएसएनएल विभागाचे अधिकारी दाखल झाले आहे. आग विझल्यानंतर नुकसानीचा अंदाज काढता येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा - Accident In Solapur : दुर्दैवी! यल्लमा देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तीन युवकांचा अपघातात मृत्यू

Last Updated : Mar 19, 2022, 1:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.