ETV Bharat / state

Maratha Protest Against Lathicharge : मराठा समाज आक्रमक; आंदोलनापूर्वीच बुलढाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड - जालना लाठीचार्ज

Maratha Protest against Lathicharge : जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या घटनेवरुन आता राजकारण तापलं आहे. आज (3 सप्टेंबर) बुलढाणा येथे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम होत आहे. तर बुलढाणा जिल्हा बंदची हाक मराठा समाजाने दिल आहे. तसेच जिल्ह्यात रास्तारोको आंदोलनही करण्यात येत आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 9:30 AM IST

Updated : Sep 3, 2023, 4:44 PM IST

बुलढाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड

बुलढाणा - Maratha Protest against Lathicharge : जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. याचे तीव्र पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटत आहेत. आज (3 सप्टेंबर) बुलढाणा येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याकरता राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बुलढाण्यात येत आहेत. यावेळी सकल मराठा समाजाने बुलढाणा जिल्हा बदंची हाक दिली. तसेच बुलढाणामधील महामार्गावर मराठा समाजाकडून रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे.

कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड - जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने आज बुलढाण्यात रास्ता रोको आंदोलनाची घोषणा केली होती. सकाळी दहा वाजेच्या सुमारास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन होणार होते. परंतु, बुलढाणा शहर पोलिसांनी बुलढाण्यातील रास्ता रोको आंदोलन होण्यापूर्वीच नेते आणि कार्यकर्त्यांना रोखले. शहर काँग्रेस अध्यक्ष दत्ता काकस यांना सकाळी पोलिसांनी घरून ताब्यात घेतले, तर अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांना सकाळी पोलिसांनी त्यांच्या घरून पोलीस स्टेशनला आणले. काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेत्यांसह जवळपास 30 ते 40 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत.

मुख्यमंत्री बुलढाण्यात - मागील तीन ते चार वेळा 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. आता हा कार्यक्रम आज पार पडत आहे. एकीकडे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम शहरात असताना दुसरीकडे मराठा समाजाने आज जिल्हा बंद आणि आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त शहरात तैनात केला आहे.

मराठा समाज आक्रमक - जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी समाजाचे काही मंडळी आंदोलनाला बसले होते. आंदोलन सुरू असतानाच शुक्रवारी (3 सप्टेंबर) अचानक या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात पोलिसांसह अनेक आंदोलकही जखमी झाले आहेत. याच्या निषेधार्थ मराठा समाजाने राज्यभर आंदोलन सुरू केलं आहे. तसेच मंत्र्यांचे् पुतळे जाळून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे आता राजकारणही तापलं आहे.

लाभार्थ्यांना लाभाचे वाटप - बुलढाणा जिल्ह्यात आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम होणार आहे. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्ह्याचे खासदार, आमदार, विभागीय आयुक्त यांच्यासह प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येत या कार्यक्रमस्थळी हजर आहेत. जालना जिल्ह्यातील लाठीचार्जनंतर बुलढाणा जिल्ह्यात होणाऱ्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय भूमिका मांडतात याकडे मराठा समाजाचे लक्ष आहे.

हेही वाचा -

  1. Raosaheb Danve On Lathicharge: वातावरण पाहून परिस्थिती हँडल केली, पण जालना पोलिसांचा लाठीचार्ज चुकीचाच- रावसाहेब दानवे
  2. Lathicharge in Jalna: मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं आंदोलकांसह पोलीसही जखमी
  3. Lathicharge in Jalna : मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जवरून शरद पवारांची सरकारवर टीका, मुख्यमंत्री म्हणाले..

Last Updated : Sep 3, 2023, 4:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.