ETV Bharat / state

लालचेपोटी स्वतःचे ४९ हजार रुपये गमावले, अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल - धाड पोलिसा नवी बातमी

लालचेपोटी एकाचे ४९ हजार लंपास केल्याची घटना मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास धाड येथे घडली. या प्रकरणी पैसे पळविणाऱ्या भामट्यांविरुद्ध धाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे भामटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

लालाचेपोटी स्वतःचे ४९ हजार रुपये गेमवले
author img

By

Published : Nov 20, 2019, 8:52 PM IST

बुलडाणा- लालचे पोटी एकाचे ४९ हजार लपास केल्याची घटना मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास धाड येथे घडली. या प्रकरणी पैसे पळविणाऱ्या भामट्यांविरुद्ध धाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे भामटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. घटनेमुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सीसीटीव्हीत कैद झालेले आरोपी

धाड येथील रहिवाशी अनिल धोंडूबा विसपुते (वय.४३) यांनी मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भारतीय स्टेट बँक शाखेतून सुमारे ४९ हजाराची रक्कम काढली. त्यानंतर शाखेबाहेर जात असताना त्यांना एका अनोळखी व्यक्तीने (वय.४०) थांबवले. त्याने अनिल यांना आपले नाव यादव असून आपण कानपूरला (उत्तर प्रदेश) राहत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर, गावी पैसे पाठवायचे असल्याचे सांगत अनिल यांना मदत करण्याची मागणी केली.

मी मुंबईत किराणा दुकानात कामावर होतो. मात्र, मालकाने मजुरीचे पैसे दिले नाहीत. म्हणून मी त्याचे अडीच लाख रुपये चोरले. ते पैसे घेऊन मी एका ट्रकमध्ये बसून तेथून निघालो. मात्र, वाटेत ट्रकचालकाने मला उतरवले. मला माझ्या गावी जायचे आहे. मला गावी पैसे पाठविण्यास मदत करा, असे म्हणत त्याने रुमालात बांधलेली रक्कम अनिलला दाखविली. त्याचबरोबर, स्वत:चे बँक खाते नसल्याने अडचण होत असल्याचे सांगितले. याबाबत कुठलीही मदद करण्यास अनिलने नकार दिला. मात्र, त्याठिकाणी असलेला दुसरा व्यक्ती(वय अंदाजे ३५) अनिल जवळ आला व त्याला बाजूला घेवून आपण दोघे या माणसाचे दीड लाख रुपये पोस्ट ऑफिसमधून पाठवू व उरलेले एक लाख रुपये अर्धे-अर्धे वाटून घेवू, असे आमिष दिले. यावर अनिलने त्यास होकार दिला.

त्यानंतर दोन्ही अज्ञात इसमांनी स्वतःची मोटारसायकल घेवून अनिलला औरंगाबाद रस्त्याने करडी फाट्यावर नेले. त्यावेळी त्यातील एका भामट्याने अनिलला दुसऱ्या गरजू व्यक्तीला बस स्थानकावर सोडून येण्यास सांगून त्यांच्या जवळची पैशांची थैली मागितली. अनिलने लालचेपोटी आपली रक्कम त्याच्या जवळ दिली व त्याच्या जवळील पैशांची थैली घेतली. त्यावेळेस अज्ञात भामट्याने अनिल विसपुते यास थोडा बाजूला जावून अडीच लाखातील दीड लाख व एक लाख वेगळे करण्याचे सांगितले.

सांगितल्याप्रमाणे अनिल मोटारसायकल घेवून थोड्या अंतरावर गेला व पैसे वेगळे करण्यासाठी थैली उघडली. मात्र, त्यात अडीच लाख रुपयांएैवजी वहीच्या पानांचा गठ्ठा आढळून आला. त्यावेळी आपली मोठी फसवणूक झाल्याचे अनिलला समजले. त्याने लगेच मोटार सायकलने त्या ठिकाणी जावून पाहिले असता उपरोक्त दोन्ही भामटे तेथे नव्हते. या प्रकरणी अनिलने धाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही अज्ञात भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. धाड स्टेट बँक शाखेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन्ही भामटे कैद झाले आहे. त्याआधारे पोलीस भामट्यांचा शोध घेत आहे.

हेही वाचा- बुलडाण्यात बी.फार्मच्या विद्यार्थ्याची गळफास घेवून आत्महत्या

Intro:Body:बुलडाणा:- लालच बुरी बला हैं या म्हणी प्रमाणे लालच पोटी एकाचे ४९ हजार पळविल्याची घटना मंगळवारी १९ रोजी दुपारी १ च्या सुमारास धाड येथून समोर आली प्रकरणी पैसे पळविणारे भामट्या विरुद्ध धाड पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले असून हे भामटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.झालेल्या घटनेमुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
 
झाले असे धाड मधील रहिवाशी अनिल धोंडूबा विसपुते वय ४३ वर्ष हा तरुण मंगळवारी दुपारी १ वां.सुमारास येथील भारतीय स्टेट बँक शाखेत सुमारे ४९ हजाराचा विड्रोल करून बाहेर जात असतांना त्याठिकाणी एका अनोळखी इसम ज्याच्या दोन्ही भुईवर व गालावर ओठावर कोडाचे डाग असलेला ४० वर्ष वयाचा ईसम भेटला त्यावेळी त्याने अनिल यास आपले नाव यादव असून आपण कानपूर (उत्तर प्रदेश )ला राहतो,व मला माझ्या गावी पैसे पाठविणे आहे.त्यामुळे तुम्ही मला मदत करा,मी मुंबईत किरण दुकानात कामावर होतो,मात्र मालकाने मजुरीचे पैसे दिले नाही नाही. म्हणून मी त्याचे अडीच लाख रुपये चोरून आणले आणि एका ट्रक मध्ये बसून येतांना वाटेत मला त्याने उतरून दिले मला माझ्या गावी जायचे आहे,तेंव्हा मला गावी पैसे पाठविण्यास मदत करा,म्हणत त्याने रुमालात बांधून आंलेले पैसे दाखवून म्हणाला कि माझे बँकेत खाते नाही त्यामुळे अडचण आहे. तेंव्हा मी तुला कही मदत करू शकत नाही असे म्हणून अनिल बाहेर निघाला त्यावेळी त्याठिकाणी अंदाजे ३५ वर्ष वयाचा दुसरा अनोळखी ईसम अनिल जवळ आला व बाजूला घेवून आपण दोघे या माणसाचे दीड लाख रु. पोस्ट ऑफिस मधून पाठवून देवू व उरलेले एक लाख रु.अर्धे-अर्धे वाटून घेवू असे आमिष दिले यावर अनिलने त्यास होकार दिला.व त्या दोघांना स्वतःच्या मोटार सायकल घेवून औरंगाबाद रस्त्याने करडी फाट्यावर नेले.त्यावेळी त्यातील एका इसमाने अनिल ला सांगितले कि,उपरोक्त इसामाजवळ्चे अडीच लाख वेगळे करा व एक लाख तुमचे जवळ ठेवा.आणि त्यास बस स्थानकावर नेवून सोडा व तुमचे जवळची पैश्याची थैली तो पर्यंत माझ्याजवळ राहू द्या .या बोलण्यावर अनिल याने लालाचपोटी आपली रक्कम त्याच्या जवळ दिली व त्याची थैली हातात घेतली त्यावेळेस त्या भामट्याने अनिल विसपुते यास थोडा बाजूला जावून अडीच लाखातील दीड लाख व एक लाख वेगळे करण्याचे सांगितले यावर अनिल मोटार सायकल घेवून थोड्या अंतरावर गेला व रुमालातील पैसे वेगळे करण्यासाठी रुमाल सोडला असता त्यात वहीच्या पानांचा गठ्ठा केलेला आढळून आला त्यावेळी आपली मोठी फसवणूक झाली असल्याचे समजले त्याने लगेच मोटार सायकलने त्या ठिकाणी जावून पहिले असता उपरोक्त दोन्ही भामटे आढळून आले नाही.या प्रकरणी अनिल ने धाड पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्याने दोन्ही भामट्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. धाड स्टेट बँक शाखेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन्ही भामटे कैद झाले आहे.पोलीस त्यांचा शोध घेत आहे..
 
-वसीम शेख, बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.