ETV Bharat / state

Heavy Rain In Buldhana : लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस; तीन शेतकरी वाहून गेले, दोन बचावले एक शेतकरी अद्याप बेपत्ता

बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले एक झाले आहेत. मात्र लोणार तालुक्यात मुसळधार पावसामुळे बैलगाडीसह तीन शेतकरी वाहून गेले होते. यातील दोन शेतकरी बचावले आहेत. तर एक शेतकरी अद्यापही बेपत्ता आहे.

author img

By

Published : Jul 5, 2023, 11:37 AM IST

Heavy Rain In Buldhana
संपादित छायाचित्र

बुलडाणा : मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात तीन शेतकरी बैलगाडीसह वाहून गेल्याने मोठी खळबळ उडाली होती. या तीन शेतकऱ्यांपैकी दोन शेतकरी बचावले असून एक शेतकरी अध्यापही बेपत्ता आहे. ही घटना लोणार तालुक्यातील शिवणी जाट येथे मंगळवारी सायंकाळी घडली. केशव बरले (50) आणि संतोष हरिभाऊ सरकटे (40) हे दोघेजण बचावले आहेत. तर समाधान सरकटे (वय 43 वर्ष ) असे बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

नाल्यात बैलगाडीसह शेतकरी गेले वाहून : मंगळवारी दुपारनंतर लोणार तालुक्यातील काही गावात मुसळधार पाऊस झाला. यावेळी शेतातून बैलगाडीने घरी जात असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे या परिसरातील नाल्याला पूर आला होता. पुरामुळे पूल खचून गेल्याचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे पुराच्या पाण्यात बैलगाडीचा तोल गेल्याने बैलगाडी पाण्यात ओढल्या गेली. यावेळी काही अंतरापर्यंत बैलगाडी पाण्यात वाहत गेली. या बैलगाडीत केशव बरले आणि संतोष हरिभाऊ सरकटे हे दोघेही पुराच्या पाण्यात वाहत होते. मात्र यावेळी नाल्यातील एका झाडाच्या फांदीला अडकल्याने त्यांचा जीव वाचवता आल्याचे केशव बरले यांनी यावेळी सांगितले. मात्र बैलगाडीत असलेल्या समाधान सरकटे हे पुरात वाहत गेले. त्यांचा सध्या शोध सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

मुळांना पकडले अन् वाचला जीव : नाल्याला आलेल्या पुरत बैलगाडीसह तीन शेतकरी वाहत गेले होते. बैलगाडी काही अंतरावर वाहुन गेल्यानंतर या बैलगाडीतील केशव बरले आणि संतोष हरिभाऊ सरकटे या दोघांच्या हाती नाल्याच्या काठावरील मूळ आले. त्यामुळे या दोघांनीही या मुळांना पकडून आपला जीव वाचवला. मात्र त्यांचे सहकारी समाधान सरकटे हे पुराच्या पाण्यात वाहत गेले आहेत. त्यांचा शोध अद्यापही लागला नाही. या बैलगाडीच्या एका बैलाचाही मृत्यू झाला आहे. ही घटना माहिती पडताच गावकऱ्यांनी समाधान सरकटे यांचा शोध घेतला, मात्र तो लागू शकला नाही. अंधार पडल्यामुळे ही शोधमोहीम बंद करण्यात आली. घटनास्थळावर लोणारचे तहसीलदार आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान दाखल झाले आहेत. दरम्यान बचावलेल्या दोन्ही नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दीड तास जोरदार मुसळधार पाऊस : जुलै महिन्यातील पहिला दमदार पाऊस पडल्याने रानात आबादानी झाली आहे. जवळपास दीड तास हा पाऊस तालुक्यात पडला आहे. लोणार, गंधारी, शिवनी जाट देऊळगाव वायसा, शारा, पांग्रा डोळे, परिसरात दमदार पाऊस पडला आहे. त्यामुळे नदी नाल्याला पूर आला आहे. शिवणी जाट परिसरात आलेल्या पुरात तीन शेतकरी वाहुन गेल्यामुळे मोठी धावपळ उडाली होती. सध्या आपत्ती व्यवस्थापन पथकास पाचारण करण्यात आले आहे. नाल्यातील पाण्यात वाहून गेलेल्या समाधान सरकटे यांचा अजूनही शोध लागलेला नाही. आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून वाहून गेलेल्या समाधान सरकटे यांचा ते शोध घेत आहेत.

हेही वाचा -

  1. Sangli Flood: पुराच्या पाण्यात चारचाकी गाडी गेली वाहून.. चालक सापडेना..
  2. Ahmednagar Flood: पुरातून चालत जाण्याचे धाडस भोवले, युवक गेला वाहून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.