चंद्रपूर- गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका घराला भीषण आग लागली. ही घटना जिवती तालुक्यातील कुंभेझरी येथे मंगळवारी रात्री घडली आहे. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. आगीत ऑटो, मोटारसायकल व शेती उपयोगी वस्तू खाक झाले आहे. आगीत अंदाजे सहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
चंद्रपूर जिल्हाच्या शेवटचा टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील कुंभेझरी या गावातील घरात अग्नितांडव घडले. नारायण पवार यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर आग भडकली. बघता बघता आगीने घराला वेढले. आगीत ऑटो व मोटरसायकल जळून खाक झाली आहे. घरात ठेवलेल्या शेती उपयोगी वस्तूही जळाल्या आहेत. आग विझविण्यासाठी गावकरी धावून आले होते. चार तासाांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. मात्र तोपर्यंत घर जळून खाक झाले होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.