ETV Bharat / state

बुलडाण्यात लग्नसमारंभात डेकोरेशन आणि बँड पथकांना परवानगी ; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा - social programmes in buldana

आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हादंडाधिकारी एस.रामामूर्ती यांनी जिल्ह्यातील सर्व मंडप व लाईट डेकोरेशन, सर्व बँड पथकांना अटींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे.

collector of buldana
बुलडाण्यात लग्नसमारंभात डेकोरेशन आणि बँड पथकांना परवानगी ; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा
author img

By

Published : Nov 4, 2020, 7:19 PM IST

बुलडाणा - शासनाकडून वेळोवेळी शिथील करण्यात आलेले निर्बंध व सूट देण्यात आलेल्या बाबी कायम ठेऊन टाळेबंदीचा कालावधी 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. शासन आदेशानुसार लग्न समारंभाच्या कार्यक्रमासाठी सोशल डिस्टसिंगचे पालन करून जास्तीत जास्त 50 व्यक्तींना सहभागी होण्याची परवानगी आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हादंडाधिकारी एस.रामामूर्ती यांनी जिल्ह्यातील सर्व मंडप व लाईट डेकोरेशन, सर्व बँड पथकांना अटींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे.

लग्न समारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या 50 व्यक्तींमध्ये सर्व मंडप डोकोरेशन, लाईट डेकोरेशन व सर्व बँड पथकांच्या सदस्यांचा समावेश असेल. एकाच ठिकाणी गर्दी न करता सामाजिक अंतर राखून बँड वाजवणे बंधनकारक असणार आहे. मंडप व लाईट डेकोरेशन व सर्व बँड पथकांच्या मालकांनी पथकातील सर्व सदस्यांचे नियमित थर्मल स्कॅनींग करून नोंद करणे आवश्यक असणार आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यादृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी.

मंडप व लाईट डेकोरेशन, सर्व बँड पथकांनी आवश्यक असणारे सर्व साहित्य नियमित निर्जंतुकीकरण करून वापरणे बंधनकारक राहणार आहे. कोरोना संबंधित वेळोवेळी निर्गमीत होणारे शासन परिपत्रक, सुचनापत्रक, आदेश व निर्णय तसेच जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी मिळालेल्या आदेशांचे कार्यक्रम आयोजित करताना काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घ्यावी. ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 अंतर्गत निर्गमीत करण्यात आलेल्या तरतुदींचे पालन करणे बंधनकारक राहील. लाऊडस्पीकर लावण्यासाठी पोलीस विभागाची स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार आहे.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी एस.रामामूर्ती यांनी कळविले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.