बुलडाणा Little Girl Rape Case : जिल्ह्यातील बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चॉकलेटचे आमिष देऊन एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाने बालिकेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तसेच तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीने बालिकेवर अत्याचार केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. बालिका बेशुद्ध झाली, मात्र तिला मृत समजून आरोपीनं पलायन केलं. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पडक्या घराजवळून एक व्यक्ती जात असताना घरातून बालिकेचा आवाज आला. त्यानं घराची कडी उघडून पाहिल्यानंतर पीडित बालिका दिसून आली. त्यावेळी तिच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता.
अल्पवयीन तरुण पोलिसांच्या ताब्यात : त्यानंतर पीडित बालिकेला बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच बोरखेडी ठाणेदार बळीराम गिते पथकासह गावात दाखल झाले. आरोपीची माहिती घेत या अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. याप्रकरणी बोराखेडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या बालिकेची तब्येत गंभीर आहे. या बालिकेला अकोला येथील रुग्णाल्यात भरती करण्यात आलंय.
-
बुलढाणा जि.तील अडीच वर्षीय मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराची विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल
— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) November 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
घटनेची सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षेबाबत Sp ना दिले निवेदन @MahaDGIPR @DGPMaharashtra @buldhanapolice1 @InfoBuldhana @Dwalsepatil @Alka_Dhupkar pic.twitter.com/5fmx5uoUn4
">बुलढाणा जि.तील अडीच वर्षीय मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराची विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल
— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) November 24, 2023
घटनेची सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षेबाबत Sp ना दिले निवेदन @MahaDGIPR @DGPMaharashtra @buldhanapolice1 @InfoBuldhana @Dwalsepatil @Alka_Dhupkar pic.twitter.com/5fmx5uoUn4बुलढाणा जि.तील अडीच वर्षीय मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराची विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल
— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) November 24, 2023
घटनेची सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षेबाबत Sp ना दिले निवेदन @MahaDGIPR @DGPMaharashtra @buldhanapolice1 @InfoBuldhana @Dwalsepatil @Alka_Dhupkar pic.twitter.com/5fmx5uoUn4
छोट्या मुलीला खाऊ देण्याचं आमिष दाखवून एका 17 वर्षीय आरोपीने तिला पडक्या घरात नेलं आणि तिथे तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुलीने ही घटना आई-वडिलांना सांगितली. त्यामुळे पोलीस तक्रार करण्यात आली. आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिला रुग्णालयात तत्काळ हलविण्यात आलंय - सुनील कडासने, जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलडाणा
गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी : महिला सुरक्षित राहाव्या याकरिता अनेक कायदे करण्यात आले. त्यामध्ये वारंवार कठोरता आणली आहे. पण, तरी देखील असे संतापजनक कृत्य समोर येत आहे. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, याकरिता पावलं उचलणं गरजेचं आहे, अशा प्रतिक्रिया महिला वर्गातून येत आहेत.
हेही वाचा: