ETV Bharat / state

बुलडाणा जिल्ह्यातील 15 मद्यविक्री परवाने कायमस्वरूपी रद्द!

गंभीर स्वरूपाच्या अवैध मद्यविक्री प्रकरणांमध्ये जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी सोमवारी 18 मे रोजी अंतिम आदेश पारीत करून मुंबई दारूबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये 15 मद्यविक्री परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत.

buldana collector action
बुलडाणा जिल्ह्यातील 15 मद्यविक्री परवाने कायमस्वरूपी रद्द!
author img

By

Published : May 19, 2020, 4:20 PM IST

बुलडाणा - राज्यात कोरोना साथरोगाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मद्यविक्री बंद ठेवण्याबाबत आदेश दिले होते. संबंधीत टाळेबंदी अर्थात लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये काही परवाना धारकांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना अवैधपणे मद्यविक्री करीत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक बी. व्ही पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांचे सखोल निरीक्षण केले.

आढळून आलेल्या गंभीर स्वरूपाच्या नियमभंग प्रकरणांमध्ये जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी सोमवारी 18 मे रोजी अंतिम आदेश पारीत करून मुंबई दारूबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये 15 मद्यविक्री परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. तसेच पाच प्रकरणेही सौम्य स्वरूपाची असल्यामुळे या प्रकरणांमध्ये दंड आकारण्यात आलेला आहे.

परवाने कायमस्वरूपी रद्द !

आर. जी. सानंदा सीएल 3 परवानाधारक खामगांव, डी. टी देशमुख सीएल 3 अमडापूर ता. चिखली, जी. एम सानंदा सीएल 3 लाखनवाडा ता. खामगांव, माधुरी राजेश बोबडे प्रोप्रा हॉटेल गौरव एफएल 3 खामगांव, मे. चौधरी वाईन शॉप एफएल 2 चिखली, प्रतिभा प्रकाश लोखंडकार प्रोप्रा. हॉटेल ग्रीनपार्क एफएल 3 खामगांव, रितादेवी गोपालदास चौधरी प्रोप्रा. हॉटेल चौधरी रेस्टॉरंट एफएल 3 खामगांव, सुनिता चंद्रकांत डवले प्रोप्रा. हॉटेल राधेय एफएल 3 मलकापूर, शे. शाहरूख शे. महम्मंद प्रोप्रा. हॉटेल नॅशनल एफएल 3 डोणगांव ता. मेहकर, अर्जुन पांडुरंग गरड प्रोप्रा. हॉटेल पॅराडाईज एफएल 3 खामगांव, किशोर पांडुरंग गरड प्रोप्रा. हॉटेल पवन एफएल 3 सुटाळा ता. खामगांव, श्रीमती प्रितमकौर जसवंतसिंग पोपली प्रोप्रा. हॉटेल दशमेश एफएल 3 सजनपूरी ता. खामगांव, विशाल शाम गरड प्रोप्रा. मे. पी. एच बिअरशॉपी एफएल /बीआर 2 सुटाळा ता. खामगांव, गोपालदास बाबुलाल चौधरी प्रोप्रा. मे. एम. आर चौधरी वाईन शॉप एफएल 2 खामगांव आणि मे. स्वस्तिक एजन्सी भागीदार ए. व्ही. राजपूत व ए. जी. सानंदा एफएल 2 सुटाळा ता. खामगांव.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.