ETV Bharat / state

असदुद्दीन ओवैसींना नियोजन शून्य व्यवस्थेचा फटका; सभेत नागरिकांची नगण्य उपस्थिती

author img

By

Published : Oct 18, 2019, 3:03 PM IST

एमआयएमचे उमेदवार मोहम्मद सज्जाद यांच्या प्रचारार्थ खासदार असदुद्दीन ओवैसी हे गुरुवारी बुलडाण्यात आले होते. यावेळी नगण्य नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी सभेला संबोधित केले. विशेष म्हणजे खा.ओवैसी नियोजीत वेळेत आल्यानंतरही सभेत नागरिकांची उपस्थिती नसल्यामुळे ही सभा ३ तास उशिरा सुरू करण्यात आली.

खा.ओवैसी

बुलडाणा - एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना बुलडाण्यात आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका बसला आहे. बुलडाणा मतदारसंघाचे उमेदवार मोहम्मद सज्जाद यांच्या प्रचारार्थ गुरुवारी ते बुलडाण्यात आले होते. ही सभा एआरडी मॉलच्या समोरच्या मैदानात संपन्न झाली. यावेळी पक्ष आणि उमेदवाराच्या नियोजन शून्य कारभारामुळे सभेला उपस्थित नागरिकांची संख्या नगण्य होती. यामुळे ही सभा ३ तास उशिरा सुरू झाली.

एमआयएमची प्रचार सभा

वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी न मिळाल्याने ऐनवेळी एमआयएमच्या चिन्हावर भारिप बहुजन महासंघाचे मोहम्मद सज्जाद हे विधानसभा निवडणूक लढवत आहे. यानिमित्त गुरुवारी सकाळी ११ वाजता बुलडाण्यात सभेचे आयोजन करण्यात आले होते. सज्जाद यांच्या प्रचारार्थ एमआयएमचे खा. असदुद्दीन ओवैसी हे गुरुवारी बुलडाण्यात दाखल झाले. मात्र, ओवैसी हे बुलडाण्यात येणार आहे, याचा प्रचार करण्यात जिल्हा पक्ष कमी पडल्याने सभास्थळी नागरिकांची उपस्थिती अत्यंत कमी होती. पक्षाचा आणि उमेदवाराचा नियोजन शून्य करभार पाहून ते अचंबित झाले. यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त करत उमेदवार सज्जादला सुनावले असल्याची माहिती आहे. या नियोजनशून्य कारभारामुळे सदर सभा ही तब्बल ३ तास उशिरा सुरू झाली.

हेही वाचा - भाजपने फक्त आश्वासनांची खैरात वाटली; ओवैसींचे टीकास्त्र

ओवैसी बुलडाण्यात आल्यानंतर एक ते दीड तासांनी सभास्थळी पोहोचले. त्यानंतर नगण्य नागरिकांच्या संख्येमध्ये ही सभा पार पडली. ओवैसी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विशेष म्हणजे ओवैसी हे बुलडाण्यात येणार आहे, याचा प्रसार-प्रचार करण्यात एमआयएमचे उमेदवार मोहम्मद सज्जाद आणि जिल्हा पक्ष हे कमी पडल्याने या सभेत उपस्थितांची संख्या कमी पडली. तसेच त्यांच्या नियोजनाच्या अभावाची चर्चा बुलडाण्यात रंगली होती.

हेही वाचा - विकासासाठी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, खडसेंची खदखद

Intro:Body:बुलडाणा:- ज्या नेत्याला पाहण्यासाठी अलोट गर्दी उसळते,ज्या नेत्याची सभेत हजारों-लाखोंच्या संख्येत जनसागर उसलतो असे नेते म्हणजे एमआयएम चे सर्वासर्वे खा.असुदुद्दीन औवेसी यांना मात्र बुलडाण्यात आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या नियोजन शुन्य कारभाराचा फटका बसला, बुलडाणा विधानसभेचे उमेदवार मोहम्मद सज्जाद यांच्या प्रचारार्थ ते गुरुवारी बुलडाण्यात आले होते.यासभेत नगण्य नागरिकांची उपस्थितीत त्यांनी सभेला संबोधित केले.विशेष म्हणजे खा.ओवैसी नियोजीत वेळेत आल्या नंतर ही सभेत नागरिकांची उपस्थिती नसल्यामुळे सभा तिन तास उशिरा सुरु करण्यात आली..एआरडी मॉलच्या समोरच्या मैदानात ही सभा संपन्न झाली.

वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी न मिळाल्याने ऐनवेळी एमआयएमच्या चिन्हावर भारिप बहुजन महासंघाचे बुलडाणा नगराध्यक्षांचे पती मोहम्मद सज्जाद हे विधानसभा निवडणूक लढवत आहे..त्यांच्या प्रचारार्थ गुरुवारी एमआयएमचे खा.असुदुद्दीन औवेसी हे बुलडाण्यात दाखल तर झाले मात्र पक्षाच्या व उमेदवाराच्या नियोजन शून्य करभार पाहून ते अचंबित झाले, यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त करत उमेदवार मोहम्मद सज्जादला झापल्याचे सुत्रांकडून माहिती मिळाली. झाले असे सभा सकाळी 11 वाजता ठेवण्यात आली होती,11 चे 1 वाजले आणि सभा 2 वाजता सुरू झाली. सभेस्थळी नागरिकांची उपस्थिती नगण्य असल्याकारणाने खा. औवेसी हे बुलडाण्यात आल्यानंतर ही 1 ते दिढ तास नंतर सभेस्थळी आले.सुरुवातीला शेकडोंच्या नंतर हजारोंच्या संख्येमध्ये ही सभा पार पडली व खा. औवेसींना आपले मनोगत व्यक्त केले.विशेष म्हणजे खा.असुदुद्दीन औवेसी हे बुलडाण्यात येणार आहे याचा प्रसार व प्रचार करण्यात एमआयएमचे उमेदवार मोहम्मद सज्जाद आणि जिल्हा पक्षाने कमी पडल्याने व त्यांच्या नियोजच्या अभावाची चर्चा बुलडाण्यात रंगली..

-वसीम शेख,बुलडाणा- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.