बुलडाणा - अयोध्या निकालाच्या पृष्ठभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात शांतता अबाधित राहून कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या अनुषंगाने चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आलाय. सर्वच अतिसंवेदनशील भागात जास्त बंदोबस्त लावण्यात आलाय, याच पृष्ठभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी 21 शांतता समितीच्या बैठका घेऊन शांततेचे आवाहन केले आहे.
यामध्ये सोशल मीडियावर देखील पोलिसांच्या सायबर विभागाची करडी नजर असणार आहे, सोबतच निकाला पश्चात मिरवणूक काढणे, फटाके वाजवणे, गुलाल उधळणे, होम हवन करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात 144 कलम लावण्यात आले असून कोणतेही चितावणी खोर, सामाजिक तेढ निर्माण करणारे नारे अश्या प्रकाराचा कोणीही प्रकार न करण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.