बुलढाणा - श्री गजाजन महाराज प्रकट दिनानिमित्त विदर्भाची पंढरी असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये भाविकांची पहाटेपासून मांदियाळी ( Gajanan Maharaj Revealed Day 2022 ) होती. अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील नागरिक हे पायतळवारी ते शेगावनध्ये दर्शनासाठी दाखल झाले. त्यामुळे श्री गजानन महाराज मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
कोरोना संसर्ग नियमांचे पालन करीत श्री गजानन महाराज मंदिरात नऊ हजार भाविकांना दर्शनाचा लाभ घेतला. त्यापुर्वी ऑनलाईन पद्धतीने भाविकांनी दर्शनासाठी नोंदणी केली होती. ज्यांची नोंदणी झाली त्यांनाच दर्शनाचा लाभ मिळाला. अवघ्या पाऊण तासाच्या आत दर्शन होत असल्यामुळे भाविकांना आनंद व्यक्त केला.
पायतळवारीने आलेल्या भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले. शेगावमध्ये जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. दर वर्षीपेक्षा या दिवशी लाखो भाविक या ठिकाणी येतात. परंतु, कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन मंदिरात होत असल्याने हजारो भाविक यावर्षी आले. मंदिराच्या बाहेर भाविकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. मंदिराजवळ पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिराजवळ कुठल्याही वाहनास परवानगी नव्हती.
हेही वाचा - Kirit Somaiya On Nawab Malik ED : शरद पवारांनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा - किरीट सोमैया