ETV Bharat / state

लॉकडाऊन काळात तलावात पोहणे पडले महागात; १८ जणांवर कारवाई

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे मॉर्निंग वॉक आणि स्विमिंगसारख्या गोष्टींवर देखील निर्बंध आहेत. मात्र, काही नागरिकांकडून या नियमांचे उल्लंघन होत असल्याने आज खामगाव पोलिसांनी अशा लोकांवर थेट कारवाईचा बडगा उगारला. अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत यांनी स्वतः खामगाव शहराजवळील जनुना तलावावर पोहचून नियम मोडत तलावात पोहणाऱ्या १८ नागरिकांवर कारवाई केली.

people custody Januna Lake Khamgaon
दुचाकी जप्त जनुना तलाव खामगाव
author img

By

Published : May 15, 2021, 5:41 PM IST

बुलडाणा - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे मॉर्निंग वॉक आणि स्विमिंगसारख्या गोष्टींवर देखील निर्बंध आहेत. मात्र, काही नागरिकांकडून या नियमांचे उल्लंघन होत असल्याने आज खामगाव पोलिसांनी अशा लोकांवर थेट कारवाईचा बडगा उगारला. अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत यांनी स्वतः खामगाव शहराजवळील जनुना तलावावर पोहचून नियम मोडत तलावात पोहणाऱ्या १८ नागरिकांवर कारवाई केली.

माहिती देताना अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत

हेही वाचा - राजा तुपाशी, प्रजा उपाशी... भेंडवळच्या घटमांडणीचे वर्तविले भाकित

नदीत पोहणाऱ्यांनी आपले कपडे सोडून तसाच काढला पळ

खामगाव शहराजवळील जनुना तलावात काही युवक पोहण्यासाठी आले असल्याची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत यांनी शिवाजी नगर पोलिसांना सोबत घेऊन स्वतः तलाव गाठले. यावेळी पोलिसांना पाहून तलावात पोहणाऱ्यांना आपले कपडे सोडून तसाच पळ काढावा लागला. पोलिसांनी तलावात पोहत असलेल्याची धर-पकड सुरू केली. यावेळी पोलीस दिसताच अनेक जण पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, मात्र पोलिसांनी यापैकी १८ जणांना पकडले. तर, उर्वरित पोहणाऱ्यांचे कपडे ताब्यात घेतले. हे पाहताच पोहणारे तलावाच्या दुसऱ्या काठाकडून उघडेच पळाले. यानंतर पोलिसांनी तलावाच्या किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या या पोहणाऱ्यांच्या २४ गाड्या जप्त केल्या व सर्वांविरोधात गुन्हे दाखल केले.

हेही वाचा - मलकापूराच्या लसीकरण केंद्रावर टोकनमध्ये हेराफेरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला नागरिकांनी दिला चोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.