ETV Bharat / state

पिण्याच्या पाण्यासाठी जलंब गावातील महिलांचा सरपंचाला घेराव - महिला

गावातील संतप्त महिलांनी सरपंचांना घेराव घालत, ग्रामपंचायत कार्यालयात पाण्यासाठी ठिय्या मांडला.

पिण्याच्या पाण्यासाठी जलंब गावातील महिलांचा सरपंचाला घेराव
author img

By

Published : Apr 23, 2019, 9:37 PM IST

बुलडाणा - शेगाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या जलंब गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या गावामध्ये महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे गावातील संतप्त महिलांनी सरपंचांना घेराव घालत, ग्रामपंचायत कार्यालयात पाण्यासाठी ठिय्या मांडला.

पिण्याच्या पाण्यासाठी जलंब गावातील महिलांचा सरपंचाला घेराव

जलंब गावामध्ये सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मात्र, याकडे ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. गावात तब्बल एका महिन्यांनी पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे गावातील संतप्त महिलांनी आपला मोर्चा ग्रामपंचायतकडे वळवला.

ग्रामपंचायतमध्ये सरपंचांना महिलांनी घेराव घालत पाण्याची मागणी केली. काही महिलांनी तर ग्रामपंचायतमध्येच आणलेल्या घागरी फोडल्या. महिलांचे संतप्त रुप पाहून सरपंच आणि ग्रामपंचायतच्या सदस्यांनी ग्रामपंचायतीमधून काढता पाय घेतला. मात्र, आम्हाला ५ ते ६ दिवसात पाणी मिळाले नाही तर आम्ही उपोषणाला बसणार असल्याचा पावित्रा महिलांनी घेतला आहे.

Intro:Body:स्टोरी:- जलंब येथे पाण्यासाठी महिलांचा सरपंचाला घेराव ग्रामपंचायत मध्ये महिलांनी फोडल्या घागरी

पाण्याचा प्रश्न पेटला महिला आक्रमक

बुलडाणा:-शेगाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जलंब गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर झाला असून गावामध्ये पंचवीस ते तीस दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. पाणीटंचाईला कंटाळून येथील महिलांनी सरपंचांना घेराव घालून ग्रामपंचायत कार्यालयात संतप्त होऊन घागरी फोडले आहेत.आम्हाला पाच ते सहा दिवसात पाणी नाही मिळाले तर आम्ही ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा महिलांनी दिल. यावेळी महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला असता सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी ग्रामपंचायत मधून काढता पाय घेतला.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.