ETV Bharat / state

लॉकडाऊन काळात गरोदर मातांच्या संख्येत 1.06 टक्क्यांनी वाढ - बुलडाणा गरोदर मातांच्या संख्येत वाढ

जिल्ह्यात लॉकडाऊन दरम्यान गरोदर मातांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यामध्ये यावर्षी एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या काळात 20 हजार 498 गरोदर महिलांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते ऑगस्टच्या कालावधीमध्ये 20 हजार 282 गरोदर महिलांची नोंद करण्यात आली होती. तर याच पाच महिन्यांच्या काळात 10 हजार 272 महिलांची प्रसूती झाली आहे.

बुलडाणा
बुलडाणा
author img

By

Published : Sep 10, 2020, 8:51 PM IST

Updated : Sep 10, 2020, 10:38 PM IST

बुलडाणा - कोरोना लॉकडाऊन काळात गरोदर मातांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे आकडेवारीनुसार समोर आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात लॉकडाऊनच्या पाच महिन्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत गरोदर मातांमध्ये यावर्षी एक टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

माहिती देताना वैद्यकीय अधिकारी

कोरोना महामारीपासून बचावासाठी शासनाने मार्चपासून लॉकडाऊनला सुरुवात केली. ऑगस्टपर्यंत राज्यात व बुलडाणा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले. जिल्ह्यात लॉकडाऊन दरम्यान गरोदर मातांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यामध्ये यावर्षी एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या काळात 20 हजार 498 गरोदर महिलांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते ऑगस्टच्या कालावधीमध्ये 20 हजार 282 गरोदर महिलांची नोंद करण्यात आली होती. तर याच पाच महिन्यांच्या काळात 10 हजार 272 महिलांची प्रसूती झाली आहे.

हेही वाचा - सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन मराठा आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत - एकनाथ शिंदे

गेल्या वर्षी पाच महिन्यात 14 हजार 331 महिलांची प्रसूती झाल्याची नोंद करण्यात आली होती. प्रसूती झालेल्या महिलांमध्ये यावर्षी पाच महिन्यात 19 महिलांची प्रसूती ही घरीच झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व नागरिक घरी असल्याने गरोदर महिलांच्या आकडेवारीत मोठ्या संख्येने वाढ होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, या पाच महिन्यात मागील वर्षीच्या तुलनेत फक्त 1.06 टक्के एवढीच वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

हेही वाचा - 'मोदीजी तुमच्या खास मित्रांना सरकारी कंपन्या देणे बंद करा'

Last Updated : Sep 10, 2020, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.