ETV Bharat / state

धक्कादायक..! बुलडाण्यात 6 महिन्यात 307 महिला आणि मुली झाल्या बेपत्ता - महिला व मुली झाल्या बेपत्ता

बुलडाणा जिल्ह्यात 1 जानेवारी ते 30 जून 2021 या सहा महिन्यांच्या कालावधी मध्ये विभिन्न वयोगटातील 480 जण बेपत्ता असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या, आणि यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे महिला व मुलींचे आहे. तर बदनामी पोटी अनेकदा तक्रारी दिल्या जात नाहीत, त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

बुलडाण्यात 6 महिन्यात 307 महिला आणि मुली झाल्या बेपत्ता

author img

By

Published : Jul 26, 2021, 7:23 AM IST

बुलडाणा - कोरोनाच्या सहा महिन्याच्या काळात बुलडाणा जिल्ह्यातून 480 जण बेपत्ता असल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. ज्यापैकी 173 पुरुष, तर तब्बल 307 महिला व मुलींचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात बेपत्ता झालेल्यांपैकी 242 जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आहे आहे. मात्र 238 जणांचा शोध घेण्यास पोलिसांना अपयश मिळाले आहे.

1 जानेवारी ते 30 जून 2021 दरम्यान 480 बेपत्ता-

कोरोनाचे संकट असताानाच लॉकडाऊन काळात घरगुती भांडण तंट्याच्या घटनामध्ये वाढ झाल्याची प्रकरणे समोर येत आहेत. वेगवेगळ्या कारणावरून घरून न सांगता निघून जाण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. बुलडाणा जिल्ह्यात 1 जानेवारी ते 30 जून 2021 या सहा महिन्यांच्या कालावधी मध्ये विभिन्न वयोगटातील 480 जण बेपत्ता असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या, आणि यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे महिला व मुलींचे आहे. तर बदनामी पोटी अनेकदा तक्रारी दिल्या जात नाहीत, त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. बेपत्ता असणाऱ्या महिलांमध्ये 18 ते 30 या वयोगटातील महिलांची संख्या ही जास्त आहे. बेपत्ता असलेल्या एकूण 480 पैकी 242 म्हणजे अर्ध्याहून अधिक लोकांचा पोलिसांनी शोध लावलाय, तर इतरांचा शोध घेणे सुरू आहे.

बुलडाण्यात 6 महिन्यात 307 महिला आणि मुली झाल्या बेपत्ता

सोशल मीडियाचा गैरवापर, दूर होत चाललेला सुसंवाद कारणीभूत- तज्ञांचा मत

अलीकडच्या काळात न सांगता घरातून निघून जाणे किंवा पळून जाणे याचे प्रमाण वाढले आहे. बेपत्ता होणाऱ्या नागरिकांची समोर आलेली शासकीय आकडेवारी ही भुवया उंचावणारी आहे. मात्र ही संख्या यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिला किंवा मुलगी घरून निघून गेल्यानंतर अनेक पालक बदनामी पोटी तक्रार दाखल करत नसल्याचे बोलले जाते. मात्र न सांगता निघून जाणे यामध्ये महिला व मुलींचा समावेश अधिक का आहे? या संदर्भात ईटीव्ही भारतने महिला तज्ज्ञांची मते जाणून घेतली , अशा घटनांमागे दोन कारणे प्रामुख्याने असू शकतात, यामध्ये सोशल मीडियाचा गैरवापर, तर दुसरा म्हणजे मुले आणि पालक यांच्यामध्ये दूर होत चाललेला सुसंवाद ही दोन कारणे यासाठी कारणीभूत असू शकतात, असे मत महिला तज्ज्ञांनी व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.